महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Indian Student Death In Ukraine : 'परिस्थितीचं गांभीर्य ओळखा आणि विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणा'; नवीनच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे टि्वट - शरद पवार लेटेस्ट न्यूज

एका भारतीय विद्यार्थ्यांचा ( Indian Student Death In Ukraine ) रशियन सैन्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी मंगळवारी समोर आली होती. या घटनेमुळे भारतीय पालकांची काळजी वाढली असून विरोधकही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ( Sharad Pawar on Indian Student Death ) ट्विट करुन संताप व्यक्त केला आणि केद्र सरकारला परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याचा सल्ला दिला आहे.

शरद पवार
Sharad Pawar

By

Published : Mar 2, 2022, 7:31 AM IST

मुंबई -रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे. युक्रेनच्या शहरावर रशियन सैन्य ताबा मिळवत जात असून अधिक आक्रमक होत चालले आहे. या युद्धात अनेक युक्रेन नागरिक देश सोडून जात आहेत. तर शिक्षणासाठी युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेले अनेक भारतीय विद्यार्थी ( Indian Students In Ukraine ) कीवमध्ये अडकले आहेत. त्यांना सुखरूप भारतामध्ये परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी मिशन गंगा राबवण्यात आले आहे. यातच एका भारतीय विद्यार्थ्यांचा ( Indian Student Death In Ukraine ) रशियन सैन्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी मंगळवारी समोर आली होती. या घटनेमुळे भारतीय पालकांची काळजी वाढली असून विरोधकही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ( Sharad Pawar on Indian Student Death ) ट्विट करुन संताप व्यक्त केला आणि केद्र सरकारला परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याचा सल्ला दिला आहे.

युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या विद्यार्थ्याच्या आणि कुटुंबीयाप्रती शरद पवार यांनी संवेदना व्यक्त केल्या. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखारप्पा यास श्रद्धाजंली अर्पण करतो. सध्या युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्यावर प्रचंड तणाव आहे. काहींना जेवणही मिळेना झालंय. परिस्थितीचे गांभीर्य ओळखावं आणि युक्रेनमध्ये अकडलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची निराशा आणि काळजी समजून घ्यावी, अशी माझी केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती आहे. तेथून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने गतीमान प्रकिया राबवावी. भारत सरकारने लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे, असे पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

रशियन सैन्याने मंगळवारी सकाळी खार्कीववर हल्ला चढवला. यात अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आले. यावेळी हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव असून, तो अवघ्या 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. हावेरी येथील भाजपा खासदार शिवकुमार चनाबसप्पा उदासी यांनी नवीन शेखरप्पा यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नवीन शेखारप्पा या भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांशी संवाद साधला.

नवीनचे शिक्षण हे शिरालकोप्पा आणि म्हैसूर येथे झालेले आहे. नंतर एमबीबीएस शिकण्यासाठी तो युक्रेनला गेला होता. नवीनचे कुटुंबीय हे शेती करतात. त्यांचे वडील शेखरप्पा यांनी आधी यूएई आणि म्हैसूर येथे एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होते. नंतर त्यांनी दोन एकर जमीन घेतली आणि शेतीकडे वळले. नवीन हा शेखारप्पाचा धाकटा मुलगा होता. आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून, गरीब परिस्थितीतही खर्च कमी असल्याने कुटुंबाने त्याला युक्रेनमध्ये एमबीबीएस करण्यासाठी पाठवले. तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता.

हेही वाचा -ETV Bharat Exclusive : युक्रेनमध्ये मृत्यू झाालेल्या नवीनच्या मित्राचा 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद, म्हणाला...

ABOUT THE AUTHOR

...view details