मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या कथित वसुलीचे(100 Crore Vasooli) आरोप केल्यानंतर परमबीर सिंग(Parambir Singh) यांनी आता पलटी मारली आहे. या प्रकरणात आपल्याकडे काहीही पुरावे नसून ऐकीव माहितीवरून आरोप केल्याचे स्पष्टीकरण परमबीर सिंग यांच्या वकिलांनी चांदिवाल आयोगासमोर(Chandiwal Commission) दिले आहे. या प्रकरणी राज्य सरकारने स्थापन केलेल्या चांदिवाल आयोगा समोर सुनावणी सुरू आहे.
माझ्याकडे एकही पुरावा नाही - परमबीर सिंग
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही. त्यामुळे मी कॅमेरासमोर साक्ष देण्याकरिता येत नाही, असे आयोगासमोर आज परमबीर सिंग यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस; ३० दिवसांत हजर राहण्याचे आदेश
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(param bir singh) यांच्या जुहू येथील घरावर फरार असल्याची नोटीस लावली आहे. मरीन लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत खंडणी प्रकरणात सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित करण्यात आले आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित(Param Bir Singh absconding) केले आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत दिली आहे. 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.
काय आहे प्रकरण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर परमबीर सिंग यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड असताना अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे असे आरोप परमबीर सिंग यांनी केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधातही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल झाले.
30 दिवसात हजर राहण्याचे आदेश -