मुंबई :शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत चालले ( Sanjay Raut Vs Kirit Somaiya ) आहेत. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या प्रकरणात त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्यावर 58 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप राऊत यांनी केला ( INS Vikrant Fund Fraud ) आहे. मुंबई पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रावर एफआयआरही ( FIR On Kirit Somaiya Nil Somaiya ) नोंदवला आहे. याच प्रकरणी राऊत यांनी सोमय्या यांच्या जुन्या ट्विटचा संदर्भ देत हा गैरव्यवहार ५८ नाही तर १४० कोटींचा असल्याचे ट्विट केले ( Sanjay Raut Criticized Kirit Somaiya ) आहे.
किरीट सोमय्या निरुत्तर : याचपार्श्वभूमीवर अडचणी वाढत असल्याचे लक्षात येताच भाजप नेते किरीट सोमय्या आज दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत पोहोचताच किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आयएनएस विक्रांत वाचवण्याची मोहीम बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. 58 कोटी डब्यांमध्ये ठेवता येतील का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. हा केवळ मला गोवण्याचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. पत्रकारांनी त्यांना आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या मोहिमेत देणगी म्हणून किती रक्कम जमा झाली आणि ती रक्कम कोणाला देण्यात आली? यावर प्रश्न विचारला असता ते उत्तर न देताच निघून गेले.