मुंबई :भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri East Assembly ByElection) होणाऱ्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही केलं आहे. तर या निर्णयामुळे आपल्याला आनंद झाला असल्याचं शरद पवारांनी (I am happy that BJP has withdrawn its candidate) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
चर्चांना पूर्णविराम : तसेच भाजपाने हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता. तर या निवडणुकीत आपला पराभव समोर दिसत असल्याने, भाजपाने माघार घेतली असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहेत. मात्र यावरही शरद पवार यांनी, भाजपाने घेतलेल्या निर्णयावर आता शंका घेण्याचं कोणतेही कारण दिसत नाही, असं म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.