महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sunil Raut on Shivsena : मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, कापला तरी प्रतारणा करणार नाही, सुनील राऊत यांचे स्पष्टीकरण - शिवसेना निष्ठा प्रतिक्रिया सुनिल राऊत

शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊत ( Sunil Raut on Balasaheb thackeray ) यांचे बंधू एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याच्या ( Sunil Raut on shivsena ) वावड्या उठल्या. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आम्हाला कापला तरी शिवसेना आणि बाळासाहेबांसोबत प्रतारणा करणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुनील राऊत ( Sunil raut news mumbai ) यांनी केले.

sunil raut comment on rebel mla
शिवसेना निष्ठा प्रतिक्रिया सुनिल राऊत

By

Published : Jun 27, 2022, 6:46 AM IST

मुंबई -शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊत ( Sunil Raut on Balasaheb thackeray ) यांचे बंधू एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याच्या ( Sunil Raut on shivsena ) वावड्या उठल्या. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आम्हाला कापला तरी शिवसेना आणि बाळासाहेबांसोबत प्रतारणा करणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुनील राऊत ( Sunil raut news mumbai ) यांनी केले. आमच्या बदनामीचा डाव असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी 20 मे लाच दिली होती एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर सडकून टीका करत आहेत. सर्व बंडखोरांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद असल्याचा दावा करत आहेत. मात्र, आता त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हेच शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी शिवसेना घरातच फुटली की काय? असा सवाल विचारला जात होता.

सुनिल राऊत यांनी ही चर्चा फेटाळून लावली. ते म्हणाले, माध्यमांनी चुकून गुवाहाटी जातोय सांगितले असेल, मी खरंतर निसर्गप्रेमी, त्यामुळे गोव्याला जाणार होतो. तिकडे जावून त्यांची तोंड बघण्यापेक्षा मी गोव्याला जाईल. बाकीच्या बातम्या केवळ जाणून-बुजून पसरवल्या जात आहेत, लोकांना आणि तिकडे असलेल्या आमदारांना कन्फ्युज करत आहेत की, संजय राऊत यांचा भाऊही गुवाहाटीला जात आहे. सुनील राऊत हा बाळासाहेबांचा सैनिक आहे. आम्हाला कापले तरी शिवसेना आणि बाळासाहेब असतील. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि शिवसेना राहणार आहोत, असे आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत गट तयार करून गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला आहे. सुमारे ३९ शिवसेनेचे आमदार त्यांच्यासोबत असून आणखी काही गुवाहाटीच्या मार्गावर आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हेही काल बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. ते सकाळपासून नॉट रिचेबल होते. मात्र, सायंकाळी ५ वाजता सामंत गुवाहटीला जाऊन शिंदे गटाला भेटले. गटातील अपक्षांसह आमदारांची संख्या आता ४६ वर गेली आहे.

हेही वाचा -Maharastra Political Crisis : बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी राज्यपाल कोश्यारी मैदानात; पोलीस महासंचालकांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details