यवतमाळ -वरूड जहांगीर येथील शेतकरी पती-पत्नी पुराच्या पाण्यात वाहून ( flood waters ) गेल्याची घटना घडली आहे. राळेगाव तालुक्यातील वरुड जहागीर ( Warud jagir ) येथील शेतकरी सुभाष राऊत, त्यांची पत्नी सुरेखा राऊत हे दररोज जागली करण्याकरिता शेतात जात होते. त्यांचे शेत हे गावातील तलावाच्या पलीकडे असल्याचे कारणाने त्यांना तलाव पार करून जावं लागतं होतं.
Husband Wife Swept Away : वरुड लघु प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेले पती-पत्नी; रायगाव तालुक्यातील घटना - Husband and wife washed away
पती-पत्नी पुराच्या पाण्यात वाहून ( husband wife swept away in flood waters ) गेल्याची घटना वरूड जहांगीर येथे घडली आहे. सकाळी 8 वाजेच्या सुमारास शेतातून परत येत आसतांन त्यांचा पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेले. मुसळधार पावसामुळे ( Heavy rain in Varood ) नदीला पूर आला होता.
सकाळी 8 वाजेच्या सुमारास शेतातून परत येत आसतांन त्यांचा पाय घसरून दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. मुसळधार पावसामुळे ( Heavy rain in Varood ) तलावात भरपूर प्रमाणात पाणी होते. दोघेही पती पत्नी तलावाच्या खालच्या ओव्हरफलो मधून येत असताना रस्ता पार करतांना पुराच्या पाण्यात पाय घसरला. दोघेही एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्न केला मात्र, त्यांना त्यात यश आले नाही.
हेही वाचा -Commonwealth Games 2022 : भारताला आणखी एक सुवर्णपदक; पी.व्ही सिंधुची 'गोल्ड'न कामगिरी