'तौक्ते' चक्रीवादळ काही तासात कोकण किनारपट्टीला धडकणार, मुसळधार पावसाचा इशारा - कोकण किनारपट्टीला चक्रीवादळ धडकणार
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला पुढील ते अजून सक्रिय होऊन 24 तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावरही होण्याची शक्यता आहे.
Hurricane Tokte hits Konkan coast
मुंबई -अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला पुढील ते अजून सक्रिय होऊन 24 तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावरही होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.
मच्छिमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा इशारा -
अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना परत बोलवण्यात येत आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
Last Updated : May 14, 2021, 7:22 PM IST