महाराष्ट्र

maharashtra

Shivsainik Join Shinde Group : वरळीतून शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील

शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Former Environment Minister Aditya Thackeray ) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून शेकडो शिवसैनिक आज एकनाथ शिंदे गटात सामील ( Shiv Sainik joins Eknath Shinde group today ) झाले.

By

Published : Oct 2, 2022, 5:35 PM IST

Published : Oct 2, 2022, 5:35 PM IST

Shiv Sainik joins Eknath Shinde group
वरळीतून शेकडो शिवसैनिक शिंदे गटात

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Former Environment Minister Aditya Thackeray ) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून शेकडो शिवसैनिक आज एकनाथ शिंदे गटात सामील ( Shiv Sainik joins Eknath Shinde group today ) झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटांमध्ये प्रवेश केला असून यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून लोक आपल्याकडे येण्याचा कार्यक्रम हा सुरूच आहे. यादीही वरळीच्या कोलीवाड्यातून शेकडोजन आपल्याशी जोडले गेले. आजही शेकडो कार्यकर्त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. हे सर्व सामान्यांच्या सरकार आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याला न्याय देईल असे जनतेला वाटतं आणि म्हणूनच लोक आमच्याशी जोडले जातात असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी वर्षा निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

वरळीतून शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील


ठाकरेंना धक्का?मोठा दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार ? यासाठी सध्या दोन्ही गटांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेच्या तोंडावरच वरळी मतदारसंघातील शेकडो शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. यासोबतच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या लोकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाला आहे. शिवसेनेची बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी आपला गट स्थापन केला. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागलेली पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार तर गेले. त्यासोबतच आता सातत्याने पक्षातील पदाधिकारी देखील एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत.


एकनाथ शिंदे यांचे वरळीत खास लक्ष :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरेंना धक्का देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत गेल्या काही दिवसापासून लक्ष केंद्रित केल आहे. गोविंदा गणेशोत्सव या सणादरम्यान मुख्यमंत्र्यांचे मोठे होर्डिंग आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात लावलेले पाहायला मिळाले होते. आता दसऱ्यालाही असेच फोर्टी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनात लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर आता थेट वरली मतदारसंघातून शेकडो शिवसैनिक प्रवेश करत असल्याने ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय.

ABOUT THE AUTHOR

...view details