मुंबई - कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासूनच म्हणजे सुरुवातीपासूनच एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होतो का? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरात एकदा अँटिबॉडीज तयार झाल्या की पुन्हा कोरोना होत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितल्याने अनेकजण चिंतामुक्त झाले होते. पण आता सर्वांचीच चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. कारण चीनसह आणि दिल्लीत ही असे रूग्ण आढळले आहेत.
चिंताजनक! कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना, अँटिबॉडीज फार काळ टिकत नाहीत? - डॉ. अडसूळ आणि डॉ. पाचनेकर
मुंबई महानगर पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा कोरोना होऊ शकतो, होत आहे हे चीनच्या उदाहरणातून स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर सेव्हन हिल्समध्येही दोन-तीन रुग्ण असे आढळले आहेत की जे कोरोना पॉझिटिव्हमधून निगेटिव्ह झाले. पण काही दिवसांनी पुन्हा त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यावरून रुग्णांच्या शरीरात व्हायरस बराच काळ राहत असल्याचे दिसून येत आहे.
यावरून रक्तात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज फार काळ टिकत नसल्याचे आणि व्हायरस शरीरातून लवकर जात असल्याने पुन्हा कोरोना होत असल्याचा निष्कर्ष मुंबईतील तज्ज्ञांनी यानिमित्ताने काढला आहे.
मध्य चीनमधील हुबईमधील एक 68 वर्षीय महिला दुसऱ्यांदा कोरोनाबाधित आढळली आहे. या महिलेला फेब्रुवारीमध्ये कोरोनाबाधित आढळली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर सहा महिन्यानंतर तिला पुन्हा त्रास झाल्याने तिची कोरोना टेस्ट केली असता ती कोरोनाबाधित आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच दिल्लीतील एका रुग्णालयातही दोन रुग्ण असे आढळले आहेत की, ज्यांना दोन महिन्यातच पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. हे चिंतेचे कारण मानले जात असून आता यावर आणखी अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा कोरोना होऊ शकतो, होत आहे हे चीनच्या उदाहरणातून स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर सेव्हन हिल्समध्ये ही दोन-तीन रुग्ण असे आढळले आहेत की जे कोरोना पॉझिटिव्हमधून निगेटिव्ह झाले. पण काही दिवसांनी पुन्हा त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यावरून रुग्णांच्या शरीरात व्हायरस बराच काळ राहत असल्याचे दिसून येत आहे. तर कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज फार काळ शरीरात टिकत नसल्याचाही निष्कर्ष पुढे येत आहे. हा व्हायरस नवीन असल्याने यावर आता अधिकाधिक अभ्यास होण्याची गरज आहे. तर महत्वाचे म्हणजे नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. माझी इम्युनिटी चांगली आहे. माझ्यात आता अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे आता मला कोरोनाची भीती नाही हा गैरसमज दूर करत काळजी घेण्याची गरज आहे. तर मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता या आपल्या जीवनाचा आता अविभाज्य भाग झाला आहे, हे मनाशी पक्की खूणगाठ बांधून यापुढे जगणे आता गरजेचे आहे, असे डॉ. अडसूळ यांनी सांगितले.
अँटिबॉडीज सहा महिनेच टिकतात?
कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरात व्हायरसविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज तयार होतात. पण या अँटिबॉडीज नेमक्या किती दिवस टिकतात याविषयी संभ्रम आहे. काहींच्या मते या तीन महिने तर काहींच्या मते सहा महिने टिकतात. त्यामुळे पुन्हा कोरोना होण्याची शक्यता वाढते. डॉ. अनिल पाचनेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष, आयएमए यांनी ही अँटिबॉडीज सहा महिने रक्तात टिकत असल्याचे मत मांडले आहे. अँटिबॉडीज नष्ट झाल्यास वा इम्युनिटी कमी झाल्यास पुन्हा कोरोना होऊ शकतो, असेही ते सांगतात.
तीन प्रकारचे कोरोना व्हायरस?
कॊरोना हा नवीन व्हायरस आहे. त्यामुळे त्याच्यावर बराच अभ्यास होणे बाकी आहे. असे असले तरी कोरोनाचे तीन प्रकारचे व्हायरस असल्याचे म्हटले जात आहे. डॉ. अडसूळ आणि डॉ. पाचनेकर या दोघांच्या म्हणण्यानुसार तीन प्रकारचे व्हायरस आहेत. एका प्रकारच्या व्हायरसची लागण होऊन गेल्यानंतर दुसऱ्या वा तिसऱ्या प्रकारच्या व्हायरसची लागण होण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे. पण या सर्व निष्कर्षाचा अभ्यास झाल्यानंतरच यावर ठामपणे बोलता येईल, असे ही या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पण त्याचवेळी योग्य ती काळजी घेणे हाच कोरोनाला दूर ठेवण्याचा उपाय असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला आहे.