महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Disaster Management : असे चालते पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे काम, घ्या जाणून.. - Disaster Management Department

मुंबईमध्ये आगी लागणे, इमारती कोसळणे, समुद्रात बुडणे, दरड कोसळणे आदी आपत्कालीन घटना रोजच घडतात. आपत्कालीन घटना घडल्यावर आपला बचाव करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्याचे कामही या कक्षाद्वारे केले जाते. अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या Disaster Management Department प्रमुख अधिकारी रश्मी राजेंद्र लोखंडे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली. Mumbai Municipal Corporation

Emergency Management
आपत्कालीन व्यवस्थापन

By

Published : Oct 12, 2022, 3:24 PM IST

मुंबई :मुंबईमध्ये आगी लागणे, इमारती कोसळणे, समुद्रात बुडणे, दरड कोसळणे आदी आपत्कालीन घटना रोजच घडतात. अशा आपत्कालीन घटना घडल्यावर बचाव यंत्रणा पाठवल्या जातात. या बचाव यंत्रणा पाठवण्याचे काम मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून Disaster Management Department केले जाते. आपत्कालीन व्यवस्थापन सोबत नागरिकांच्या तक्रारीच्या नोंदीही या कक्षात केल्या जातात. त्याचप्रमाणे आपत्कालीन घटना घडल्यावर आपला बचाव करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्याचे कामही या कक्षाद्वारे केले जाते अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी रश्मी राजेंद्र लोखंडे यांनी "ई टीव्ही भारत"शी बोलताना दिली. Mumbai Municipal Corporation


असा सुरु झाला आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष : १९९३ मध्ये लातूरला भूकंप झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आणि महापालिकेला आपत्कालीन व्यवस्थापनाचा एक आराखडा आणि कक्ष स्थापन करण्यास सांगितले. त्यानुसार पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला. १९९९ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्तांनी संकल्पना मांडली. उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्याकडे काम देण्यात आले. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने वायरलेस आणि इतर यंत्रणा हाताळण्याचे काम योग्य प्रकारे करणाऱ्या सुरक्षा विभागातील ७ ते ८ कर्मचाऱ्यांना या कक्षात प्रतिनियुक्तीवर घेऊन दोन खोल्यांमध्ये कक्ष सुरु झाला.

एकच मध्यवर्ती नियंत्रण कक्ष असावा : २००० मध्ये असे लक्षात आले की अनेक ठिकाणी एकच तक्रार केली जाते. त्यासाठी एकच मध्यवर्ती नियंत्रण कक्ष असावा असा निर्णय घेण्यात आला. १०८ आणि १९१६ हे हेल्पलाईन क्रमांक घेऊन मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला. २०१४ पर्यंत १०८ आणि १९१६ दोन क्रमांक वापरले जात होते. ३ दूरध्वनी, १ वायरलेस १ हॉटलाईन १ संगणक १ ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही या यंत्रणेवर २००० पासून २००५ पर्यंत दरड कोसळणे, सीरियल बॉम्ब ब्लास्ट, मोठ्या इमारती कोसळणे आणि २६ जुलै २००५ ची पूरसदृश्य परिस्थिती यासारख्या सर्व आणीबाणीच्या तक्रारी हाताळल्या जात होत्या. त्यानंतर या विभागाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर त्यावेळचे पालिका आयुक्त जॉनी जोसेफ यांनी तळमजल्यावर ४५०० चौरस फुटाच्या जागेत कक्ष सुरु करण्यात आला. या कक्षात वाहतूक पोलिसांच्या २५० सीसीटीव्हीचे फीड देण्यात आले होते. १०८ आणि १९१६ हेल्पलाईन्सच्या लाईन वाढवण्यात आल्या. त्यावेळी खऱ्या अर्थाने या कक्षाचा बेसिक कन्सेप्ट सुरु झाला.

परळ येथील इमारतीमध्ये बॅक अप नियंत्रण कक्ष : २००६ ते २०१७ या कालावधीत सर्व आपत्कालीन घटना तळ मजल्यावरील कक्षातून हाताळण्यात आल्या. २०१७ मध्ये राज्य सरकराने व्हिडिओ वॉल देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २ ऱ्या मजल्यावर अद्यायावत कक्ष सुरु करण्यात आला. या कक्षात ५३६१ सीसीटीव्हीचे फीड आहे. याचा उपयोग आपत्कालीन घटना घडल्यावर मॉनेटरिंग करण्यासाठी येतो. परळ येथील इमारतीमध्ये बॅक अप नियंत्रण कक्ष आहे. पालिका मुख्यालयातील कक्ष बंद झाल्यास हा कक्ष आपोआप सुरु होतो अशी माहिती रश्मी लोखंडे यांनी दिली.


सॉफ्टवेअर द्वारे व्यवस्थापन :मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील विस्तारित इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अद्ययावत आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षात १९१६ या हेल्पलाइनवर आणीबाणी आणि नागरी सुविधांबाबत तक्रारी येतात. तक्रारी नोंदवल्यानंतर संबंधितांना तक्रार क्रमांक दिला जातो. संबंधित विभाग, अभियंत्यांकडे तक्ररी पाठवल्या जातात. अभियंत्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यात नोंद केली जाते. त्याचप्रमाणे आणीबाणीच्या तक्रारींसाठी कमांड आणि कंट्रोल नावाचे सॉफ्टवेअर सूर केले आहे. तक्रार आल्यावर जीआयएस वर मॅप केली जाते. त्या ५०० मीटरच्या परिसरात लागणाऱ्या ज्या यंत्रणा कामी येणार आहेत त्याची माहिती आणि संपर्क क्रमांक संगणकावर दिसते. सॉफ्टवेअर स्वता कोणत्या यंत्रणा लागणार आहे हे दाखवत तसेच त्या यंत्रणांना संदेश पाठवला जातो. संदेश पाठवल्यावर संबंधित यंत्रणेच्या लोकांना हॉट लाईनवरून फोन करून फोन द्वारे याची सूचना दिली जाते. २०११ १०८ यंत्रणा होत्या त्यांना १४ यंत्रणांमध्ये विभागण्यात आले आहे. आपत्कालीन घटनेच्या वेळी या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना या कक्षात बसवले जाते. यामुळे ते त्यांच्या यंत्रणांशी बोलून लागणारी यंत्रणा उपलब्ध करून देतात असेही लोखंडे यांनी सांगितले.


संपर्कासाठी ५३ हॉट लाईन : ५३ हॉट लाईन त्यातील २४ वॉर्ड कंट्रोल, ४ पालिका हॉस्पिटल १ सरकारी जेजे हॉस्पिटल, मंत्रालय, पोलीस, अग्निशमन दल, रेल्वे, नेव्ही, आर्मी, कोस्ट गार्ड, मेट्रो रेल्वे नियंत्रण कक्षाशी जोडल्या गेल्या आहेत. २४ वॉर्डमध्ये प्रत्येकी ४ हॉट लाईन त्यात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष, बॅक अप नियंत्रण कक्ष, स्थानिक पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाची जोडल्या गेल्या आहेत. फोन, हॉटलाइन, डिजिटल मोबाईल रेडिओ, हॅम या संप्रकासाठी यंत्रणा आहेत. तसेच व्हीएचएफ बदलून रोबोस्ट डिजिटल मोबाईल रेडिओ ही यंत्रणा सुरु केली आहे. यामधून ग्रुप करून बोलता येते. आपत्कालीन घटना घडल्यावर आपली वाहने कुठे आहे हे पाहणे या यंत्रणेमुळे शक्य झाल्याचे लोखंडे म्हणाल्या.


वेबसाईट आणि ऍप :डिझास्टर मॅनेजमेंटची वेबसाईट आणि ऍप आहे. त्याद्वारे नागरिकांना आपत्कालीन घटनांची माहिती दिली जाते. पावसाची १५ मिनिट, ६ तास आणि १२ तास अशी माहिती नागरिकांना याद्वारे दिली जाते. समुद्राला मोठी भरती कधी आहे यापासून कोणत्या विभागात जास्त पाऊस पडला याची माहितीही यावर उपलब्ध करून दिली जाते. नागरिकांना आपण ज्या ठिकाणी आहोत त्या जवळचे हॉस्पिटल, पोलीस ठाणे याची माहिती याद्वारे मिळते. तसेच या अँपमध्ये एसओएस बटन दिले आहे. आपल्या जवळच्या ५ जणांचा क्रमांक यावर सेव्ह करता येतो. एखाद्या आपत्कालीन घटना घडल्यास हे बटण दाबल्यास नागरिकांनी नोंदवलेल्या जवळच्या ५ जणांना आपोआप संदेश जातो.


वर्षाला १ लाख कॉल :कोविड काळात याच आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामधून ८ लाख कॉल हाताळण्यात आले. त्यावेळी पाऊस आणि वादळ होते. अशा परिस्थितीत रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ऍम्ब्युलन्स शववाहिनी मिळवून देणे अशी कामेही करण्यात आली. या कक्षात सध्या वर्षाला नागरी तक्रारी आणि आपत्कालीन घटना यांचे ८० हजार ते १ लाख कॉल येतात.


परळ येथे प्रशिक्षण :आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना ट्रेनिंग दिले जाते. आपत्कालीन घटना घडल्यावर काय करावे काय करू नये याचे प्रशिक्षण दिले जाते. २००७ पासून प्रशिक्षण दिले जाते. त्यात प्रामुख्याने शाळा, शिक्षक, विद्यार्थी, कंपनीमधील कर्मचारी यांचा समावेश असतो. परळ येथे ४ माळ्याची इमारत असून त्याठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरु आहे. चौथ्या मजल्यावर एक ३ डी ऑडिटोरियम आहे. तळघरात आर्ट गॅलरी आहे त्यात आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली आहे. ४ प्रशिक्षण वर्ग आहेत. एक वर्षाचा "पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिझास्टर ऍण्ड इंडस्ट्रियल फायर सेफ्टी" या विषयावर डिप्लोमा कोर्स सुरु केला आहे. मुंबई विद्यापीठ आणि गरवारे इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून हा डिप्लोमा कार्स सुरु आहे. सध्या त्याची ५ वी बॅच आहे अशी माहिती लोखंडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details