ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीएम केअर फंडातून राज्याला मदत किती? माहिती अधिकारात मिळेना माहिती - pm care fund news

पीएम केअर फंडातून राज्याला किती मदत मिळाली यासंदर्भातली माहिती ही माहिती अधिकारात मिळत नाही.

mumbai
संग्रहित फोटो
author img

By

Published : May 14, 2021, 7:38 PM IST

Updated : May 14, 2021, 10:34 PM IST

मुंबई - कोरोना काळात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच पीएम् केअर फंडातून मदत केली जात आहे. मात्र, या मदतीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, पीएम केअर फंडातून राज्याला किती मदत मिळाली यासंदर्भातली माहिती ही माहिती अधिकारात मिळत नाही.

माहिती देताना सागर उगले

हेही वाचा -'स्पुटनिक-५' लसीची किंमत ९९५ रुपये प्रतिडोस; रेड्डी लॅब्सची घोषणा

पीएम केअर फंडातून राज्याला आरोग्य विषयक उपकरण पुरवली आहेत. तसेच या उपकरणावर मेक इन इंडियाचा टॅग देखील लावण्यात आला आहे. पीएम केअर फंडासाठी मदतीचे आवाहन देखील केले होते. याच अनुषंगाने अनेक धनदांडग्या व्यक्तींनी यात आर्थिक मदत केली होती. नेमकं पीएम केअर फंडात किती जणांनी डोनेशन केले आणि याच फंडातून किती राज्यांना व्हेंटिलेटर मिळाले याची माहिती माहितीच्या अधिकारात सागर उगले या माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी मागवली.

in article image
पीएम केअर संदर्भातली माहिती

सागर उगले यांना मिळालेल्या माहितीनुसार, पीएम् केअर फंड हा वैयक्तीक असून याची माहिती सार्वजनिक करता येणार नाही. हा केअर फंड पब्लिक अथॉरिटीमध्ये येत नाही. या माहितीच्या अनुषंगाने सागर उगले यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यानुसार जर पीएम् केअर फंडाच्या माध्यमातून केंद्र सरकारने मदत केली आहे तर मग यात पारदर्शकता का नाही? वेबसाईटवर डोनेशनचे ऑप्शन दिले आहेत मग सविस्तर माहिती का पुरवली जात नाही? असे प्रश्न उगले यांनी उपस्थित केले आहेत.

पीएम केअर संदर्भातली माहिती

हेही वाचा -गुजरात : ६ दिवस व्हेटिंलेटरवर राहून झुंज; ४ महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात

Last Updated : May 14, 2021, 10:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details