मुंबई - आज पहाटे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले व चौकशीनंतर अटक केली. या प्रकरणात गोवावाला कंपाउंड चर्चेत आले आहे. मलिकांमुळे चर्चेत आलेले गोवावाला कंपाउंड कसं आहे? याबद्दल 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने पाहणी केली.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -Nawab Malik Arrested : नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोजचा तलवार नाचवून जल्लोष
गोवावाला कंपाउंड हे मुंबईतील कुर्ला भागात आहे. ही अतिशय मोक्याची जागा असून, या भागाच्या एका बाजूला कुर्ला रेल्वे स्टेशन तर, दुसर्या बाजूला विद्याविहार रेल्वे स्टेशन जवळ आहे. अतिशय मोक्याची जागा असून, सध्या येथील जागेचा दर लाखो, करोडोच्या घरात आहे. याच भागात फिनिक्स मॉल आहे.
ही जागा बीकेसी म्हणजेच, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणापासून अगदीच जवळ आहे. कुर्ला डेपो परिसर देखील याच भागात येतो. असे सर्वच बाजूंनी मोक्याची जागा असल्याने इथल्या जागेचे दर देखील चढे आहेत. हा परिसर मुस्लीम बहूल परिसर असून अनेक कुटुंब गोवावालामध्ये राहतात.
हेही वाचा -Mumbai Kala Ghoda : अल्बर्ट ससून यांनी सातव्या राजकुमार प्रति बांधलेला 'काळा घोडा' पुतळा