मुंबई -अभिनेता किरण माने ( Actor Kiran Mane ) यांच्यावर अद्यापही अन्याय सुरूच असल्याचा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी केला आहे. वाहिनीने पाठवलेल्या तक्रारीच्या पत्रातला फोलपणा त्यांनी उघड केला आहे. अभिनेता किरण माने याला मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्याच्यावर गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र यासंदर्भात कोणताही पुरावा आरोप करणाऱ्यांनी दिला नाही. माने यांच्याविरोधात एक तरी लेखी पुरावा दाखवा, असे आव्हान आपण केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
'वाहिनी पाठवलेल्या पत्रात तारखांचा घोळ'
किरण माने हे सेटवर गैरवर्तन करत असल्याबाबत किरण माने यांना २१ जानेवारी २०२१ रोजी पत्र पाठवण्यात आले होते, असे वाहिनीने सांगितले आहे. वास्तविक हे पत्र माने यांच्याकडे पाठवताना पत्रावर पडलेली पोस्टाची तारीख ही गेल्या आठवड्यातील असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा अर्थ आरोप करणारे बिनबुडाचे आरोप माने यांच्यावर करत असल्याचा दावा, जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
'शरद पवार यांची प्रकृती स्थिर'