महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोलिसांसाठीची तयार घरे ३ लाखांनी महाग.. सिडकोचा कारभार; किमती कमी करण्याची मनसेची मागणी - मनसे पत्रकार परिषद न्यूज

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने जुलै २०२० मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. सिडकोने स्वस्त घरात पोलिसांना घरे दिल्याचे भासवले असले तरी वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये सर्वसामान्यांसाठी काढलेली सोडत १४ हजार ५०० घरांसाठी होती. तांत्रिक अडचणींमुळे त्या योजनेतील अनेक घरे रद्द झाली होती. प्रथम दर्शनी रद्द झालेली घरेच किंमत वाढवून पोलीस योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

पोलिसांसाठी घरे न्यूज
पोलिसांसाठी घरे न्यूज

By

Published : Dec 11, 2020, 12:40 PM IST

Updated : Dec 11, 2020, 12:54 PM IST

नवी मुंबई - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने जुलै २०२० मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. सिडकोने स्वस्त घरात पोलिसांना घरे दिल्याचे भासवले असले तरी वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये सर्वसामान्यांसाठी काढलेली सोडत १४ हजार ५०० घरांसाठी होती. तांत्रिक अडचणींमुळे त्या योजनेतील अनेक घरे रद्द झाली होती. प्रथम दर्शनी रद्द झालेली घरेच किंमत वाढवून पोलीस योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच, बहुतांश घरांचे बांधकाम पूर्ण झालेले असताना पोलिसांना ही घरे पावणेदोन लाख ते तीन लाखांनी महाग का विकली जात आहेत, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. यावर नाराजी व्यक्त करत मनसेने घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांसाठीची तयार घरे ३ लाखांनी महाग.. सिडकोचा कारभार

हेही वाचा -'महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभारामुळेच बीडीडी चाळीसह धारावीचा विकास रखडला'


२०१८ पासून २०२० पर्यत सिडकोच्या घरांच्या किमती

२०१८ मधील सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटातील तळोजा, सेक्टर २७ मधील २९८.२ चौरसफूट घराची किंमत २५ लाख ४० हजार ९०० रुपये होती. ती वाढवून २८ लाख ४४ हजार २०० रुपये केली. ही रक्कम साधारणपणे ३ लाख ३ हजार ३०० रुपयाने वाढवली आहे. २०१८ मधील सोडतीमध्ये घणसोलीतील ३२० चौरसफूट घराची किंमत २५ लाख ३८ हजार ९०० रुपये होती. सध्या पोलिसांसाठी काढलेल्या योजनेतील अशाच घराची किंमत २७ लाख ९२ हजार ८०० रुपये आहे. २०१८ मधील सोडतीमध्ये खारघर मधील ३२० चौरस फूट घराची किंमत २६ लाख ३५ हजार २०० रुपये होती. ती किंमत पोलिसांच्या योजनेमध्ये २८ लाख ९८ हजार ७०० रुपये आहे.

अतिरिक्त किमतीमुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी मनसेकडे व्यक्त केली नाराजी

एकाच वेळी बांधलेल्या घरांची किंमत पोलिसांसाठी साधारण २.५० लाख ते ३ लाख रुपयांनी जास्त आहे. अशीच दरवाढ पोलिसांसाठी असलेल्या योजनेतील इतर घरांबाबतही आहे. या अतिरिक्त किमतीमुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनसेकडे नाराजी व्यक्त केली. तसेच हा पोलिसांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त केली.

२०१८ला जी घरांची किमती होती तितकी किंवा त्यापेक्षा कमी किंमत घ्यावी मनसेची भूमिका

मनसेने या प्रश्नावर आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. सिडकोने ६५ हजार घरांची सोडत २०२० मध्ये काढणार असल्याचे जाहीर केले. तसेच सिडकोने या घरांची किंमत बाजारभावापेक्षा साधारण १० लाखाने कमी असणार असे जाहीर केले. मग पोलिसांकडून अतिरिक्त शुल्क का आकारले जाते? याच धर्तीवर सिडकोने पोलिसांसाठी काढलेल्या घरांसाठी अतिरिक्त सवलत जाहीर करावी, अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली. तसेच सिडकोने पोलिसांसाठी काढलेल्या घरांची किंमत २०१८ मधील सोडतीएवढी किंवा त्याहून कमी करावी, अशी मागणी मनसेने केली.

हेही वाचा -नाईट क्लबमध्ये विनामास्क धांगडधिंगाणा सुधारा, अन्यथा नाईट कर्फ्यु लावू, पालिका आयुक्तांनी दिला इशारा

Last Updated : Dec 11, 2020, 12:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details