मुंबई- मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान व शिव कल्याण केंद्र संचलित चालता फिरता दवाखाना मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा संकल्प आमदार प्रसाद लाड ( BJP MLA Prasad Lad ) यांनी व्यक्त केला. चालता फिरता दवाखाना संकल्पना सादर करताना नागरिकांना आजारपणाचा त्रास होतो. अनेक जण पैशाअभावी आजारपण अंगावर काढतात. यामुळे मोठे आजार बळावून नयेत यासाठी त्यांना प्रथमोपचार मिळावेत म्हणून हे चालते फिरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. यात शासकीय योजना व विमा योजनेंतर्गत मोफत उपचार मिळणार आहेत. हे रुग्णालय दक्षिण-मध्य मुंबईतील 16 ठिकाणी 76 पेक्षा जास्त झोपडपट्टी व गरीब वर्ग भागात फिरणार आहे.
Hospital On Wheel : चालत्या फिरत्या रुग्णालयाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान व शिव कल्याण केंद्र संचलित चालता फिरता दवाखाना मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा संकल्प आमदार प्रसाद लाड ( BJP MLA Prasad Lad ) यांनी व्यक्त केला. त्यानुसार एका रुग्णावाहिकेमार्फत हे चालता फिरता रुग्णालय मुंबईतील विविध ठिकाणी असणार आहे. यात शासकीय योजना व विमा योजनेंतर्गत मोफत सुविधा मिळणार आहेत.
आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून व शिवकल्याण केंद्र, हनुमान टेकडी यांच्या संचलनातून हे चालत्या फिरत्या रुग्णालयाचे वसंत स्मृती दादर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केले. सर्व नागरिकांनी या चालत्या फिरत्या दवाखान्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून केली आहे.
हेही वाचा -Illegal schools Maharashtra : अबब...! राज्यात ६७४ शाळा अनधिकृत; सर्वाधिक मुंबईत