मेष -आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. आज गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल. कौटुंबिक विरोध संभवतो. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच अडकून पडण्याची शक्यता आहे. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी.
वृषभ - आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार - व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचे कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील. दुपार नंतर नवीन कामाचे यशस्वी नियोजन करू शकाल. व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन -आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक दृष्टया अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनप्राप्ती संभवते. कुटुंबात सुख शांती नांदेल.
कर्क - आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संतती विषयक चिंता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी झालेल्या वादामुळे आपल्या मनाला दुःख होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हितावह राहील.
सिंह - आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. दुपार नंतर मानसिक नैराश्य जाणवेल. संतापाची भावना वाढेल. कुटुंबात वादविवाद होऊ नयेत ह्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कन्या - आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल. घरात सुखशांती नांदेल. प्रत्येक कामातून दृढ मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. एखादा प्रवास संभवतो.