मुंबई -सरकारी आस्थापणामध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून एखादे सामान्य नागरिकाचे काम जर करायचा असेल तर त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात लाच मागितली जात असल्याच्या घटना, तक्रारी आपण नेहमीच ऐकत आणि पाहत आलेलो आहोत. मात्र राज्य उत्पादन शुल्काच्या विभागात उपनिरीक्षक म्हणून काम करणाऱ्या अनिल शिंदे या अधिकाऱ्याने त्यास 50 हजारांची लाच देऊ पाहणाऱ्या एका बार मालकाला लाच लुचपत विभागाकडून अटक करून दिली असल्याचे समोर आले आहे. एकीकडे सरकारी आस्थापनांमध्ये भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला असताना उत्पादन शुल्क खात्यातील अनिल शिंदे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे एक आदर्श नागरिकांसमोर निर्माण झाला असल्याचे समोर आले आहे.
बार मालकाने देऊ पहिली 50 हजारांची लाच
मुंबईतील काळा चौकी परिसरात असलेल्या गीता बार या हॉटेलकडून लॉकडाऊन काळामध्ये रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्याची परवानगी असताना सुद्धा रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाला मिळाल्यानंतर या संदर्भात राज्य उत्पादन खात्याचे उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी काळाचौकी येथील गीता बारवर धाड मारून कारवाई केली होती. या दरम्यान मोठ्या प्रमाणात दारूचा साठा सुद्धा त्यांनी जप्त केला होता. या बारचा मालक मोहन शेट्टी याने राज्य उत्पादन शुल्कने केलेल्या कारवाई दरम्यान जप्त केलेली दारू ही कमी दाखवून इतर दारू पुन्हा मिळवण्यासाठी उपनिरीक्षक अनिल शिंदे यांना 50 हजारांची लाच देऊ पाहिली होती.
अनिल शिंदे यांचा प्रामाणिकपणा