मुंबई -मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे, ते देखील महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजे यांची प्रकृतीदेखील महत्त्वाची आहे. आज झालेल्या चर्चेमध्ये सर्व मुद्दे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांना सांगण्यात येणार असून या मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. हे आंदोलन लवकरात लवकर संपुष्टात आले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीदेखील जवळचा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी यावेळी दिली आहे.
संभाजीराजे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न -
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण सुरु झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. संभाजीराजेंच्या उपोषण स्थळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज भेट देऊन संभाजीराजे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि उपोषण संपुष्टात आणण्याची मागणी संभाजीराजे यांच्याकडे केली. मात्र, राजे यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला आहे.