मुंबई -आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप झालेले वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. तसेच हे प्रकरण आता तपासासाठी सीआयडीकडे ( CID ) देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse ) यांनी कायदा-सुव्यवस्था वरील चर्चेच्या उत्तरात दिली. दरम्यान, आज दिवसभरात अर्थ संकल्प यावर चर्चा होत असताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मागील आठवड्यात स्टिंग ऑपरेशन केलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. यावरही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्त्तर दिले आहे.
विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डीटेक्टीव इजन्सी चालवता - जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले. यावेळी गृहमंत्र्यांनी फडणवीसांना याधीचे पेन ड्राईव्हचे दाखले दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपण पाच हजार विहिरीचे पेन ड्राईव्ह दिले होते. मागील आठवड्यात आपण एक अध्यक्ष यांना पेन ड्राईव्ह दिला, आजही आपण वक्फ बोर्डावर लांबे याची नियुक्ती कशी केली याचा एक पेन ड्राईव्ह दिला, विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डीटेक्टीव इजन्सी चालवता, असा टोला गृहमंत्री वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत लगावला आहे.