महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

साकीनाका बलात्कार प्रकरण : पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावल्याने न्याय प्रक्रियेला गती मिळाली - गृहमंत्री - साकीनाका बलात्कार प्रकरण दिलीप वळसे पाटील

पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावून हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली, यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ( dilip walse patil on sakinaka rape case result ) आज मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली, यावर माध्यमांशी ते बोलत होते.

साकीनाका बलात्कार प्रकरण
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

By

Published : Jun 2, 2022, 7:59 PM IST

मुंबई - मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावून हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ( dilip walse patil on sakinaka rape case result ) दरम्यान, हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा १० मिनीटे इतका जलद होता. या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावून हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या कार्यतत्परतेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home minister dilip walse patil ) यांनी समाधान व्यक्त केले. महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलीस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश याद्वारे समाजात पोहोचावा, अशा सूचना गृहमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

न्यायालयाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा - महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणी मोठी ( Sakinaka Rape Case ) बातमी समोर आली आहे. बलात्कार आणि हत्या केल्या प्रकरणात आरोपी मोहन कतवारू चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

हेही वाचा -साकीनाका बलात्कार प्रकरणावर न्यायालयाचा मोठा निर्णय; आरोपीला फाशीची शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details