महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Home Minister Walse Patil on Rana case : 'रवी राणा यांच्यावरील गुन्ह्याप्रकरणी पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी' - अमरावती शिवाजी महाराज पुतळा हटवला प्रकरण

आमदार रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था पोलीस महासंचालकांच्या मार्फत चौकशी करण्यात येईल ( Home Minister Walse Patil on Rana case )अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज विधानसभेत ( Assembly Session 2022 ) केली.

Home Minister Walse Patil
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

By

Published : Mar 7, 2022, 3:31 PM IST

मुंबई -आमदार रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था पोलीस महासंचालकांच्या मार्फत चौकशी करण्यात येईल ( Home Minister Walse Patil on Rana case )अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (सोमवार) विधानसभेत ( Assembly Session 2022 ) केली.

विरोधी पक्षातील आमदारांनी केली चौकशीची मागणी -

अमरावती जिल्हा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनधिकृतपणे बसवण्यात आलेला पुतळा हटवण्यात आला होता. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यादिवशी आपण दिल्लीत असताना ही आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे हा प्रकार केला गेला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी आपल्याला दिली, असल्याचे राणा यांनी सभागृहात सांगितले. राणा यांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी सभागृहात गदारोळ करीत चौकशीची मागणी केली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मार्फत चौकशी करणार - वळसे-पाटील

अखेरीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भात खुलासा करीत कोणत्याही वरिष्ठ नेत्याने या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या नव्हत्या पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला योग्य वाटले ती कारवाई त्यांनी केली आहे. मात्र तरीही सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था पोलिस महासंचालकांनी मार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे विधान सभेत जाहीर केले.

हेही वाचा -Malik in judicial custody: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details