मुंबई -खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत, आपण मागासवर्गीय असल्यामुळे आपल्याला तुरुंगात ( Dilip Walse Patil on Navneet Rana ) शौचालय वापराला दिला नाही. तसेच, पिण्याचे पाणीही दिले नाही, असे गंभीर आरोप ( Dilip Walse Patil news on Navneet rana ) केले आहेत. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून नवनीत राणा ( Dilip Walse Patil on Navneet rana jail treatment ) यांनी केलेल्या आरोपांमध्ये वस्तुस्थिती असल्याचे वाटत नाही, असे म्हटले.
प्रतिक्रिया देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेही वाचा -Power Cut In Mumbai : मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक विभागात बत्ती गुल
नवनीत राणा यांनी ( Navneet rana jail news Mumbai ) केलेले आरोप गंभीर असून याबाबतचे तक्रार पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडे माहिती मागितली आहे. याबाबतची परिपूर्ण माहिती लोकसभा अध्यक्षांना लवकरात लवकर दिली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आज दुपारी जनता दरबारनंतर गृहमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली.
पोलीस कायद्याने कारवाई करत आहे -राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, राज्यातले पोलीस हे कायद्याने कारवाई करत आहे. आतापर्यंत झालेल्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली असल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी ( Dilip Walse Patil news Mumbai ) दिले.
राज ठाकरेंच्या सभेबाबत दोन दिवसांत निर्णय -औरंगाबादमध्ये 9 मे पर्यंत जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणारच, असा पवित्रा त्यांच्या पक्षाकडून घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सभेबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. मात्र, त्यांची सभा होऊ द्यायची की नाही? याबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त निर्णय घेतील. मात्र, जर कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर, त्याच्यावर कारवाई नक्की केली जाईल, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.
शूट अॅट साईटचे आदेश नाही -भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल सीआयएसएफकडून घेण्यात आली असून, पुढे असाच हल्ला झाला तर शूट अॅट साईट चे आदेश देण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, असे आदेश देता येत नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत राज्य सरकारला देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच, मुंबई पोलीस सर्व प्रकरणात नियमानुसारच कारवाई करत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा -Suspicious Transgender loot women : ट्रेनमध्ये महिलेला लुटणाऱ्या संशयित तृतीयपंथीयाला पोलिसांनी केली अटक