मुंबई- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ट्विटमध्ये वळसे पाटील म्हणाले की कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी वैद्यकीय उपचार सुरू केल आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे -
नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.असं आवाहन देखील यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
Last Updated : Oct 28, 2021, 2:17 PM IST