महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Loudspeaker Controversy : 'भोंग्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर धोरण जाहीर करावे' - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

एका विशिष्ट समाजा संदर्भातील भूमिका घेताना त्याचे परिणाम खेडेगावात होतील. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळी भूमिका ( law on loudspeakers ) घेता येणार नाही. सर्वांसाठी एकच भूमिका घ्यावी लागेल, अशी सडेतोड भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी मांडली आहे.

Loudspeaker Controversy
भोंग्या वाद

By

Published : Apr 25, 2022, 7:32 PM IST

Updated : Apr 25, 2022, 10:30 PM IST

मुंबई - भोंग्यांवरून राज्यात घमासान सुरू असले तरी कायदा सर्वांना समान आहे. एका विशिष्ट समाजा संदर्भातील भूमिका घेताना त्याचे परिणाम खेडेगावात होतील. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळी भूमिका ( law on loudspeakers ) घेता येणार नाही. सर्वांसाठी एकच भूमिका घ्यावी लागेल, अशी सडेतोड भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी मांडली आहे. केंद्र सरकारने भोंग्या संदर्भात राष्ट्रीय ( Loudspeaker Issue ) पातळीवर धोरण जाहीर करावे, अशी मागणी वळसे पाटील यांनी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात आज (सोमवारी) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अनेक नेत्यांची अनुपस्थिती -या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर खासदार इम्तियाज जलील बैठकीला अनुपस्थित होते.

'राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यावा' :सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांबाबत दिलेला निर्णय सर्व देशाला लागू होतो. केंद्र सरकारने यामुळे राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यावा. जेणेकरून राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होणार नाही. आवश्यकता भासल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढू या, असे बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल. तसेच राज्य सरकार अनेक परिपत्रक काढले आहेत. त्याच्या आधारे, आपण निर्णय घेत आहोत. पोलीस विभागातील अधिकाऱ्यांशी याबाबत बोलणार असून गाईडलाईन्स नव्याने बनवण्याची आवश्यकता आहे का, हे ठरवावे लागेल, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

राणा दाम्पत्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली - राणा दाम्पत्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा ( Mumbai High Court ) दिलासा मिळाला नसून न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळली ( Mumbai HC on Rana Couple Petition ) आहे. राणा दाम्पत्यांना दुसऱ्या FIR मध्ये कारवाई करण्यापूर्वी 72 तास आधी कळवणे गरजेचे आहे असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे.

विधानसभेला 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) या दाम्पत्याला शनिवारी खार पोलिसांनी अटक केली त्यानंतर वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी मुंबई पोलीस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. या पत्राची दखल लोकसभा सचिवालयाने घेतली असून यासंदर्भातील अहवाल २४ तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा - राज्यात राष्ट्रपती राजवट ( Sharad Pawar on president rule ) लागू करता येईल अशी परिस्थिती आहे, असे भाजपच्यावतीने सांगण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar on devendra fadnavis in pune ) यांना विचारले असता, हे खरे आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हा काही नवीन भाग नाही. सगळेच शरद पवार नसतात. माझी कित्येकदा सरकार गेली. पण, मी कधीही अस्वस्थ झालो नाही, असा टोला शरद पवार ( Sharad Pawar attack on devendra fadnavis ) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तर देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई पत्रकार परिषद घेऊन राज्यात सुरू असलेल्या गोंधळावर ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

अजान सुरु असताना लाऊडस्पीकरवर गाणे वाजविल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल -

औरंगाबादमध्ये अजान सुरू असताना ( Azaan ) एक पोलीस उपनिरीक्षकाने ( filed case on Police Sub-Inspector ) मोठ्या आवाजात गाणे लावले म्हणून संबंधीत पोलीसावर सातारा पोलीस ( Satara Police ) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कृत्य करणारे पोलीस रेल्वे पोलिसांत उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. किशोर गडप्पा मलकूनाईक असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. घराच्या मागे असलेल्या मस्जिदच्या दिशेने नमाज पठन सुरु असताना मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणे लावले. यातून 2 धर्मात तेढ निर्माण होऊ शकते आणि वेगवेगळ्या गटात शत्रुत्व वाढू शकते. त्यामुळे ही क्रिया चिथावणीखोर असल्याचे पोलिसांच म्हणणे आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा -Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरेंच्या सभेला अद्यापही परवानगी नाही; मनसेकडून जय्यत तयारी

Last Updated : Apr 25, 2022, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details