महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत; राणा दाम्पत्य माघार घेण्याची शक्यता

जबाबदार लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. तेढ वाढायला नको, तसेच कोणती स्टंटबाजी केली जाऊ नये. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबई दौरा आहे. त्यामध्ये कुठलेही निर्विघ्न येऊ नये, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

By

Published : Apr 23, 2022, 2:17 PM IST

Updated : Apr 23, 2022, 2:28 PM IST

मुंबई - पोलिसांना सूचना केल्या असून शिवसेनेचे कार्यकर्ते परत पाठवले जाईल. असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. जबाबदार लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. तेढ वाढायला नको, तसेच कोणती स्टंटबाजी केली जाऊ नये, असेही ते म्हणाले.

हेही वाचा-Stone pelting at Ravi Rana house Amravati : अमरावतीत आमदार रवी राणांच्या घरावर दगडफेक, प्रचंड तणाव

लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहे. स्व. लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या मोदी मुंबई दौऱ्यावर आहे.

नवनीत राणा माघार घेण्याची शक्यता - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असल्याने नवनीत राणा माघार घेण्याची शक्यता आहे. पोलिसांशी त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे माघार घेतल्यास त्यांना सुरक्षितपणे काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असेल.

Last Updated : Apr 23, 2022, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details