महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्याचा गृहमंत्री देशमुख यांच्याकडून समाचार

मनसुख हिरेन प्रकरणात फक्त खूनीच शोधणार नाही, तर त्यापलीकडीलही माहिती मिळवेन, माझा अधिकार आहे तो. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले.

home-minister-deshmukh-criticizes- fadanvis
home-minister-deshmukh-criticizes- fadanvis

By

Published : Mar 9, 2021, 10:10 PM IST

मुंबई -मनसुख हिरेन प्रकरणात फक्त खूनीच शोधणार नाही, तर त्यापलीकडीलही माहिती मिळवेन, माझा अधिकार आहे तो. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा असे सांगत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मंगळवारी विधानसभेत आक्रमक झाले.

नाना पटोले मला धमकी देतात, मी घाबरत नाही असे सांगत त्यांनी आपली चौकशी करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मंगळवारी मनसुख हिरेन प्रकरणाच्या निमित्ताने सचिन वझे आणि मनसुख हिरेन यांच्यातील संभाषणाचा सीडीआर देवेंद्र फडणवीस यांना मिळालाच कसा ? असा सवाल केला होता.

हे ही वाचा - फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात - अशोक चव्हाण

देवेंद्र फडणवीसांचे मुंबई पोलिसांबाबत वक्तव्य -

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी सवांद साधताना म्हणाले की, मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई पोलिसांचं तोंड काळ झालं आहे, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केली होती.
या टीकेला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस याच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी बोलले. स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. गेली पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना साथ दिली. प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. मुंबई पोलिसांचे 'थोबाड काळे झाले' अशाप्रकारची भाषा कसे वापरू शकतात? असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

हे ही वाचा - पुण्यात केक कापून कोरोनाचा पहिला वाढदिवस साजरा

महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

देवेंद्र फडणवीस एवढा राग का काढत आहेत. याबाबतच्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. परंतु, त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत असा आरोपही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे म्हणून सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत करू नका असे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details