महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांनी बोलवली बैठक - law and order in Maharashtra
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस खात्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक बोलावली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठकी आढावा घेतला जाणार आहे. अकरा वाजता पोलीस महासंचालक कार्यालयात बैठक होईल.
![महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत
गृहमंत्र्यांनी बोलवली बैठक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतगृहमंत्र्यांनी बोलवली बैठक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15178604-130-15178604-1651543603839.jpg)
मुंबई - मशिदीवरील भोंग्यांबाबत मनसेने ३ मेचा अल्टीमेटम दिल्याने राज्याचे गृहखाते सतर्क आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस खात्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक बोलावली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठकी आढावा घेतला जाणार आहे. अकरा वाजता पोलीस महासंचालक कार्यालयात बैठक होईल.
मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच ३ मेच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे ४ तारखेपासून मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यामुळे बिघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. संवेदनशील भागांचा आढावा घेऊन, सुरक्षा वाढवली जाणार आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा कशा रीतीने सामना करायचा, याबाबत व्यूहरचना आखली जाणार असल्याचे समजते.
भाषणाचा अहवाल तयार -राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेत केलेल्या भाषणाचा अहवाल पोलिसांनी तयार केला आहे. आजच्या बैठकीत हा अहवाल मांडला जाणार आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, यावर पोलिसांची टीम काम करणार असल्याचे समजते.