महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मागासवर्गीयांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत'; दोषींविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश - home minister of maharashtra

मागासवर्गीय तरुणांच्या हत्यांवरून राज्यभर क्षोभ वाढत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत दलित समाजावर होणारे अन्याय, अत्याचार सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन पीडितांच्या पाठीशी असून या प्रकारच्या गुन्ह्यांतील दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

dalit discrimination in maharashtra
'दलित समाजावरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत'; दोषींविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश

By

Published : Jun 10, 2020, 7:04 PM IST

मुंबई - मागासवर्गीय तरुणांच्या हत्यांवरून राज्यभर क्षोभ वाढत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत मागास समाजावर होणारे अन्याय, अत्याचार सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन पीडितांच्या पाठीशी असून या प्रकारच्या गुन्ह्यांतील दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब आणि मागासवर्गीयांवर अन्याय-अत्याचार होता कामा नये, असे ते म्हणाले.

राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवीत दोन-तीन दिवसांपूर्वी एका दलित मुलाला मारहाण झाली. यात त्याचा मृत्यू झाला होता. संबंधित प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी पकडले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

तसेच नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथील अरविंद बनसोड या तरुणाच्या मृत्यूची चौकशी देखील पारदर्शी व निःपक्षपातीपणे करण्यात येईल. त्यासंबंधातील निर्देशही आपण पोलीस विभागाला दिले आहेत. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे हा तपास वर्ग केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details