मुंबई -दिल्लीतील जेएनयु विद्यापीठामध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया' येथे झालेल्या आंदोलनात, एका महिला आंदोलनकर्तीने फडकवलेला 'फ्री काश्मीर' हा फलक देशभरात चर्चेचा विषय झाला. मंगळवारी गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात 'फ्री काश्मीरचे' फलक फडकवणारी महेक प्रभुचा देखील समावेश आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करू, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानभवनात सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... 'फ्री काश्मीर' प्रकरणी महेक प्रभू, उमर खालिदसह अन्य 34 जणांवर गुन्हे दाखल
फ्री काश्मीर या फलका संदर्भात आंदोलक महेक यांची काय भूमिका होती, हेही जाणून घेतले जाईल. मात्र महेक यांनी वॉट्सअपवर पाठवलेल्या व्हिडिओमधून त्यांची भूमिका आधीच स्पष्ट झाली आहे. त्यांनी इतरांना पाठवलेल्या अन्य संदेशाची देखील चौकशी करू, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा... जेएनयूत पोहोचली दीपिका, सोशल मीडियावर ट्रेंड #BoycottChapaak #SupportDeepika
महेक प्रभू यांनी दर्शवलेल्या फलकावरून त्यानी थेट स्वतंत्र काश्मीरची मागणी केली, असा त्याचा अर्थ होत नाही. काश्मीरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. तिथली नेट सेवा देखील सुरळीत नाही. अनेक नेत्यांना डांबून ठेवण्यात आले होते. जमावाला भाषण बंदी आहे, या संदर्भात हा फलक असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे देशमुख म्हटले आहे.