महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'... तर कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांना देखील बोलावलं जाईल' - एनआयए

कोरेगाव-भीमा येथे हिंसा भडकवण्यात हात असलेल्या अनेक लोकांची नावे वगळण्यात आली आहेत का? याबाबतचा तपास राज्याच्या एसआयटीमध्ये होणार होता. यातून अनेकांची नावे उघड होण्याची भीती मागच्या सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना वाटत असावी, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.

home minister anil deshmukh press conference
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Jan 29, 2020, 6:54 PM IST

Updated : Jan 29, 2020, 10:15 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने राज्य सरकारला विचारात न घेता, कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास करणारा आयोग, राज्याच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चौकशीसाठी बोलावू शकतो, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'इंदिरा गांधीनींही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला' मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा राज्याच्या राजकारणात घोळत असून या प्रकरणात अनेकांना गोवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास राज्याला विचारात न घेता केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला दिल्या प्रकरणी पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावर आपली भूमिका मांडताना देशमुख यांनी, कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा तपास NIA कडे सोपवल्याचे कळले. पण यासंदर्भातील पत्र अद्याप माझ्यापर्यंत आले नसल्याचे म्हटले आहे.

पूर्वग्रह मानसिकतेतून काही लोकांना या प्रकरणात गोवण्यात आले का ? अशी शंका अनेक लोकांनी आतापर्यंत व्यक्त केली. तसेच कोरेगाव-भीमामध्ये हिंसा भडकण्यात हात असलेल्या लोकांची नावे यातून वगळण्यात आली आहेत का? याबाबतचा तपास राज्याच्या एसआयटीमध्ये उघड होईल, अशी भीती मागच्या सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना वाटत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला. त्यामुळेच दंगलीचा तपास NIA कडे सोपवल्याचे देशमुख यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद...

हेही वाचा... भारत बंद : राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;

  • केंद्र सरकारकडून कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासाबाबतचे अद्याप कोणतेही पत्र मिळालेले नाही
  • मागील भाजप सरकारमध्ये काही दंगेखोराना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याच्या तक्रारी आल्या असल्याचे, देशमुख यांनी म्हटले.
  • कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे द्यायचा की नाही, हा कायदेशीर विषय आहे. मात्र, राज्य सरकारला याबाबतीत केंद्र सरकारने विश्वासात घेतले नाही.
  • केंद्राच्या या निर्णयाचा आम्ही विरोध केला असल्याचेही देशमुख यावेळी म्हणाले.
  • कोरेगाव येथील दंगलीबाबत जे कमिशन नेमण्यात आले आहे. ते कमिशन चौकशीसाठी कोणालाही बोलवेल. यात वेळ प्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही बोलवले जावू शकते, असे देशमुख यावेळी म्हणाले.

हेही वाचा... भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल भाजपमध्ये

  • कोरेगाव भीमा इथे झालेल्या दंगलीचा तपास NIA कडे सोपवल्याचे समजले आहे. पण त्याबाबतचे पत्र अद्याप माझ्यापर्यंत आले नसल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
  • पूर्व ग्रह मानसिकतेतून काही लोकांना या प्रकरणात गोवण्यात आले का? या संदर्भात अनेक लोकांनी शंका व्यक्त केल्याचे देशमुख यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
  • कोरेगाव-भीमामध्ये हिंसा भडकण्यात हात असलेल्या लोकांची नावे वगळण्यात आली आहेत का? याबाबतचा तपास राज्याच्या एसआयटीमध्ये उघड होईल, अशी भीती मागच्या सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना वाटत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
  • केंद्राचे पत्र जोपर्यंत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणाच्या चौकशीला मदत कशी करता येईल अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली असल्याचे देशमुख यांनी सांगितले
  • मनसेच्या मोर्चाला तपासणी केल्यानंतरच परवागनी देण्याचा निर्णय घेऊ, असेही देशमुख यावेळी म्हणाले.
Last Updated : Jan 29, 2020, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details