महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शक्ती कायद्यासाठी राज्यभरातील निमंत्रित महिला व वकील संघटनासोबत होणार चर्चा - mumbai news today

शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यातील निमंत्रित महिला तसेच वकील संघटनांसोबत शक्ती कायद्यासंदर्भातील विधीमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

anil deshmukh
anil deshmukh

By

Published : Jan 6, 2021, 7:46 PM IST

मुंबई - महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतीमान पद्धतीने कार्यवाही व्हावी, या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यातील निमंत्रित महिला तसेच वकील संघटनांसोबत शक्ती कायद्यासंदर्भातील विधीमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

'मत लेखी स्वरुपात असावे'

मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे या बैठका होणार आहेत. यासाठी महिला संघटना व वकील संघटना या निमंत्रित राहणार आहेत. 11 जानेवारी रोजी नागपूर, 19 जानेवारी मुंबई येथे तर २९ जानेवारीला औरंगाबाद येथे या बैठका होतील, असे समितीच्या 5 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत ठरले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. यासाठी संबंधितांनी आपले मत हे लेखी स्वरुपात आणावे. संबंधित तारखेला तीनही ठिकाणी दुपारी ३ वाजता निमंत्रित महिला संघटना तसेच संध्याकाळी ५ वाजता वकिल संघटना असे वेळ देण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन

माता-भगिनी, बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता शक्ती हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा, या करिता नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आलेले आहे.

तीन प्रतींमध्ये सूचना-सुधारणा

या समितीचे अध्यक्ष देशमुख आहेत. या विषयामध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, महिलांच्या संघटना, विधिज्ञ, स्वयंसेवी संस्था आपल्या सूचना अथवा सुधारणा सुचवू शकतात. या विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रति शासकीय ग्रंथागार नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच शासकीय मुद्रणालय चर्नी रोड मुंबई येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या विधेयकाची प्रत संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे. संबंधितांनी आपल्या सूचना-सुधारणा निवेदनाच्या स्वरूपात तीन प्रतींमध्ये विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळ, बॅकबे रिक्लेमेशन मुंबई येथे किंवा a1.assem-bly.mls@gmail.com या ई-मेलवर 15 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details