जळगाव - 20 फेब्रुवारीला एका वसतीगृहातील मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने गरब्यासाठी घातलेल्या कपड्यांचा त्रास झाल्याने ते कपडे काढून ठेवले. पोलिसांनी या महिलेबरोबर कोणताही अनुचित प्रकार केला नाही. ह्या वसतिगृहात पोलीस गेले नाहीत. पोलीस वसतिगृहात गेल्याची कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांकडून देण्यात आले आहे.
चार वरिष्ठ अधिकारी महिलांच्या समितीने केली चौकशी
या प्रकरणात चार महिला अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी केली. त्यामध्ये पोलीस वसतीगृहात आल्याची कुठलीही नोंद नाही. तसेच पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा प्रकार कुठेही आढळून आला नाही, असा अहवाल महिला अधिकाऱ्यांनी दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. सदर महिलेच्या नवऱ्याने अनेकदा आपली पत्नी वेडसर असल्याचे सांगितले आहे. तिला मनोरुग्णालयात पाठवण्यात यावे, असेही त्याने म्हटले होते. या वसतीगृहात कोणताही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. किंबहुना पोलिसांना या वसतीगृहात जाण्याची परवानगी नाही. 20 फेब्रुवारीला या वसतीगृहात मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने गरब्यासाठी घातलेल्या कपड्यांचा त्रास व्हायला लागल्यामुळे ते काढून ठेवले.