मुंबई - बॉलिवूड आणि भाजपमधील ड्रग प्रकरणाची चौकशी करण्याबाबत एनसीबीने चार दिवसात निर्णय घेतला नाही तर मुंबई पोलीस त्याचा तपास करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. बॉलिवूड व भाजपमधील ड्रग कनेक्शन संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.
हेही वाचा -रामाच्या नावाने किती वर्षे राजकारण करणार? शिवसेनेची भाजपवर टीका
काँग्रेसच्या नेत्यांनी 31 ऑगस्टला पत्र दिले आहे. हे पत्र मी एनसीबीला दिले आहे. मात्र, त्याबाबत काहीही कारवाई झालेली नाही. आज पुन्हा काँग्रेसचे नेते मला भेटले असून, त्यांनी कालच विवेक ओबेरॉय याच्या घरी बंगळुरू पोलिसांनी चौकशी केल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे गृहमंत्री म्हणाले.
विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा निर्माता आणि अभिनेता आहे. त्याच्या मेव्हण्याचा शोध बंगळुरू पोलीस घेत आहेत. मोदी यांच्या बायोपिकचा आणखी एक निर्माता संदीप सिंग यानेही भाजप नेत्यांना 56 कॉल केले होते. या प्रकरणाची चौकशीची मागणी केली जात आहे. बॉलिवूड आणि भाजपमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी करण्याबाबत एनसीबीने चार दिवसात निर्णय घेतला नाही, तर मुंबई पोलीस त्याचा तपास करतील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.