मुंबई -शहरातील प्रसिद्ध सिद्धीविनायकाचे केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दर्शन घेतले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यानी त्यांच्याबरोबर आगामी निवडणुकीसाठी यश लाभो यासाठी सिद्धीविनायक बाप्पा जवळ पार्थना केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिद्धीविनायक चरणी; भाजप नेत्यांसोबत गुप्त चर्चा - मुंबई बातमी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर गुप्त चर्चा होणार आहे. यासाठी ते मुंबईत आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या सोबत भाजपचे आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यानी अमित शाह यांचे विमानतळावर स्वागत केले. आज अश्विन शहा आणि महाराष्ट्रातील काही नेत्यांबरोबर आगामी निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. सिद्धीविनायकाचरणी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, अमित शाह येणार असल्याने सकाळी पोलिसांनी भाविकांच्या रांगा देखील थांबवल्या होत्या.
सिद्धीविनायक मंदिर परिसरातील दुकाने देखील बंद होती. अमित शाहांच्या सुरक्षेखातर पोलिसांनी मोठी दक्षता आणि सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती. दर्शन झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर गुप्त चर्चा होणार आहे. त्यासाठी ते मुंबईत आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देखील अमित शाह जाणार आहेत. सिद्धिविनायक दर्शनानंतर अमित शाह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.