महाराष्ट्र

maharashtra

राज्यात घरोघरी लसीकरण मोहीम सुरू होणार, प्रायोगिक तत्त्वावर पुण्याची निवड

By

Published : Jun 30, 2021, 10:41 PM IST

राज्यात आता घरोघरी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या लसीकरणाची सुरुवात सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातून होणार आहे. पुणे शहराची लोकसंख्या पाहता आणि विस्तार पाहता याची सुरुवात पुण्यातून होणार आहे.

राज्यात घरोघरी लसीकरण मोहीम
राज्यात घरोघरी लसीकरण मोहीम

मुंबई -राज्यात आता घरोघरी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या लसीकरणाची सुरुवात सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातून होणार आहे. पुणे शहराची लोकसंख्या पाहता आणि विस्तार पाहता याची सुरुवात पुण्यातून होणार आहे. प्रथमत: प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहराची निवड करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर हा प्रयोग राबवला जाईल, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टात सांगितली.

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने विचारले प्रश्न -
घरोघरी लसीकरण मोहीम या संदर्भात 12 मे रोजी एक सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नाचे उत्तर 30 जून रोजी राज्य सरकारने हायकोर्टाला द्यावयाची होती.

1. घरोघरी लसीकरणासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या परवानगीची गरज का आहे?
2. राज्य सरकार प्रत्येक काम केंद्र सरकारला विचारूनच करते आहे का?
3. केरळ, बिहार आणि झारखंड या राज्य सरकारने घरोघरी लसीकरणासाठी केंद्राची परवानगी घेतली होती का?

राज्य सरकारकडून आज या प्रश्नांची उत्तरे हायकोर्टात देण्यात आली. केंद्राच्या परवानगीची आता आम्ही वाट पाहणार नाही आहोत. आम्ही घरोघरी जाऊन लसीकरण मोहीमेची सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला विदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी परदेशात जात आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज्य सरकारने पुढे हायकोर्टाला असेही सांगितले. सुरुवातीला आम्ही पुणे जिल्ह्याची निवड करत आहोत. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या तसेच पुणे जिल्ह्याचा विस्तार पाहता हाच जिल्हा लसीकरणासाठी प्रायोगिक तत्त्वावर योग्य आहे. असे राज्य सरकार कडून हायकोर्टात सांगण्यात आले.

असे होणार रजिस्ट्रेशन
लवकरच राज्य सरकार यासंदर्भात एक मेल जनरेट करणार आहे. या इमेलद्वारे नोंदणी केली जाणार आहे. ज्यांना घरी लस हवी आहे, अशाची नोंदणी या इमेलवर केली जाईल. त्यांना लस उपलब्ध करून दिली जाईल.

हेही वाचा -आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक

ABOUT THE AUTHOR

...view details