महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाच्या रुग्णांवर एचआयव्ही औषधांचे संशोधन, मात्र परिणामाचा पुरावा नाही - डॉ. पद्मजा केसकर - hiv

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. भारतातही याचे रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसवर कोणतीही औषधे नसली तरी काही भारतातील डॉक्टरांनी एड्सची लस आणि औषधे देऊन कोरोना रुग्णांना बरे केल्याचा दावा केला आहे.

mumbai
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर

By

Published : Mar 19, 2020, 10:03 PM IST

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. भारतातही याचे रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसवर कोणतीही औषधे नसली तरी काही भारतातील डॉक्टरांनी एड्सची लस आणि औषधे देऊन कोरोना रुग्णांना बरे केल्याचा दावा केला आहे. अशी औषधे मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाही देण्यात येतात का? याबाबत विचारले असता, या औषधांचा रुग्णांवर परिणाम होतो का, याचे संशोधन सुरू आहे. मात्र, त्याचा परिणाम झाल्याचा कोणताही पुरावा नाही, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूच्या संक्रमणाने आतापर्यंत ९ हजारहून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधित १७२ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात चार जणांनी आपले प्राण गमावले असले तरी १४ जणांवर उपचार यशस्वी झाले आहेत. उपचारानंतरदेखील या रुग्णांचा फॉलोअप आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात येतोय.

या व्हायरसचे महाराष्ट्रात ४९ तर, मुंबईत १८ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत या व्हायरसची लागण झालेल्या एका रुग्णाचा १७ मार्चला मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर जगभरात कोणतीही लस अद्याप बनवण्यात आलेली नाही. काही डॉक्टरांनी कोरोना व्हायरसच्या रुग्णांना एचआयव्ही म्हणजेच एड्सची औषधे देऊन बरे केल्याचा दावा केला आहे. तर, काही डॉक्टरांनी आम्ही एड्सची औषधे कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांना देत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अशी औषधे मुंबई महानगरपालिकेकडून कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना दिली जात आहेत, असा प्रश्न आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना एड्सवर कोणतीही लस नाही. मात्र, एड्सवर औषधे आहेत. एड्सच्या औषधांचा परिणाम कोरोनाबाधित रुग्णांवर होतो का, याचे संशोधन सुरू आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर एड्सच्या औषधांचा परिणाम होतो असा पुरावा अद्याप मिळालेला नाही. यामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना एड्सची औषधे दिली जात नसल्याचे डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details