महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Jyotirlinga : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांचा इतिहास आणि महत्त्व

देवांचा देव महादेव आणि सगळ्यात भोळा नाथ म्हणून भगवान महादेवाची Lord Mahadev ओळख आहे. भगवान शंकराची आराधना करण्यासाठी श्रावण महिना shravan month पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना करण्यासाठी सर्व लोक भगवान शंकराविषयी माहिती घेत असतात. पुराणामध्ये सांगण्यात आले आहे, की भगवान शंकर जिथे जिथे प्रकट झाले. त्या त्या स्थानावरती ही ज्योतिर्लिंग निर्माण करण्यात आलेली आहेत. देशामध्ये अशी बारा ज्योतिर्लिंगे 12 Jyotirlinga  आहेत. तर महाराष्ट्रात त्यातली पाच Jyotirlinga In Maharasjtra ज्योतिर्लिंगे आहेत.

Maharashtra Jyotirlinga
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग

By

Published : Aug 8, 2022, 4:35 PM IST

Updated : Aug 15, 2022, 8:02 AM IST

मुंबई -देवांचा देव महादेव आणि सगळ्यात भोळा नाथ म्हणून भगवान महादेवाची Lord Mahadev ओळख आहे. भगवान शंकराची आराधना करण्यासाठी श्रावण महिना shravan month पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधनाकरण्यासाठी सर्व लोक भगवान शंकराविषयी माहिती घेत असतात. पुराणामध्ये सांगण्यात आले आहे, की भगवान शंकर जिथे जिथे प्रकट झाले. त्या त्या स्थानावरती ही ज्योतिर्लिंग निर्माण करण्यात आलेली आहेत. देशामध्ये अशी बारा ज्योतिर्लिंगे ( 12 Jyotirlinga आहेत. तर महाराष्ट्रात त्यातली पाच Jyotirlinga In Maharasjtra ज्योतिर्लिंगे आहेत.

वैजनाथ परळी -परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग Parli Vaijnath )मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या mahashivratri दिवशी वैद्यनाथ जयंती असते. तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगात परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. त्याशिवाय मंदिर परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ किलो मीटर अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० किलो मीटर अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र देखील आहे.

नागनाथ हिंगोली - बारा ज्योतिर्लिंग हे भारतातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके या ठिकाणी भगवान महादेवांची पूजा करतात. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग Nagnath Jyotirlinga हे त्यापैकी एक आहे. नागनाथ हिंगोली जिल्ह्यातआहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हा आठवा मानला जातो. म्हणून या तीर्थस्थानाला महत्व प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की, युधिष्ठिर याने हस्तिनापूरचान 14 वर्षे त्याग केला होता. नागनाथ मंदिरात उत्तम दर्जाचे कोरीव काम आहे. मंदिर हेमाडपंती वास्तूशिल्प असून सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रावर स्थित आहे. शिवरात्री आणि विजयादशमीवर मोठ्या संख्येने यात्रेकरू या मंदिरात येतात.

घृष्णेश्वर औरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे ११ किलो मीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग Ghrishneshwar Jyotirlinga मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणांचे उल्लेख मिळतात.वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. त्यानंतर १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती सुधर्मा आणि पत्नी सुधा यांच्या कथेपासून सुरू होते. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते. परंतु सुधा कधीही आई होऊ शकत नव्हती. म्हणून सुधाने तिची धाकटी बहीण घुश्मासोबत पतीचे लग्न लावले. वेळ गेला आणि धाकट्या बहिणीने एका सुंदर मुलाचा जन्म झाला. हळू हळू सुधाच्या मनात ईर्षेची बीजे निर्माण झाली . एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि ज्या तळ्यामध्ये घुश्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती. त्याचा मृतदेह दफन केला.घुश्माला या गोष्टीचे वाईट वाटले पण तिने शिव आराधन सुरू ठेवली एके दिवशी शिवलींग तळ्यात विसर्जीत केल्यावर तिला मुलगा जिवंत बाहेर आल्याचे दिसले. शंकराने तिला तिच्या भक्तीचे फळ दिले होते.

त्र्यंबकेश्वर नाशिकत्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे Trimbakeshwar Jyotirlinga . सर्व १२ ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र “गंगा गोदावरी” नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात. पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले. जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचे आश्रम होते. केलेल्या अपराधातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसंन्न होऊन महादेवांनी त्रिमूर्ती ज्योतिर्लिंग स्वरूप धारण केले आमि तिथेच विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द “प्रकाशस्तंभ” दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच “ब्रह्मा-विष्णु-महेश” विद्यमान आहेत. या ज्योतिर्लिंगाची “त्रिकाल पूजा” केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे ३५० वर्षांपासून सुरू आहे.

भीमाशंकर पुणेया ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्यात आहे. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ अशी इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असतात. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केल्या आहेत.

हेही वाचाUjjain Mahakaleshwar Temple : महाकाल मंदिरात भाविकांची झुंबड, भास्मीत बाबांचे थेट दर्शन

Last Updated : Aug 15, 2022, 8:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details