मुंबई - मुंबईत असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदान याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. (August Revolution) येथूनच महात्मा गांधींनी "भारत छोडो" आंदोलनाची हाक देशवासीयांना दिल. (Historical August Revolution Ground) या मैदानातून सुरू झालेल्या चळवळीमुळे ब्रिटिशांना देशातून आपली सत्ता सोडावी लागली होती.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन बोलावले
पारतंत्र्यात असताना ब्रिटिश राजवट संपावी यासाठी देशाच्या क्रांतिकारकांनी मोठा लढा दिला आहे. या लढाईमध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. (August Revolution Ground History 2022) 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी "भारत छोडो" चळवळीची सुरुवात मुंबईतून केली. महात्मा गांधी यांनी गोवालिया टँक( आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन बोलावले. देशभरात उभारणाऱ्या चळवळीचे केंद्रबिंदु त्यावेळेस ऑगस्ट क्रांती मैदान होते.
ऑगस्ट क्रांती या मैदानातून सुरू
ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधी यांनी "भारत छोडो" आंदोलनाची हाक दिली. ब्रिटिशांनी देशावरची सत्ता सोडण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला होता. ऑगस्ट क्रांती मैदानातून सुरू झालेल्या या चळवळीत हजारो क्रांतिकार यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व हुतात्मे पत्करणार्या क्रांतिकार यांना आदरांजली म्हणून ऑगस्ट क्रांती मैदान ची ओळख आहे.