महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

History of Mumbai CSMT : मुंबई मेरी जान; सीएसएमटी जगात भारी... - Mumbai hostorical news

अनेक मुंबईकरांच्या धकाधकीच्या प्रवासाला विराम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( History of Mumbai CSMT ) येथे लागतो. मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आहे त्यापैकी एक म्हणजे जगविख्यात सीएसएमटी इमारत आहेत.

Mumbai CSMT
Mumbai CSMT

By

Published : Apr 26, 2022, 8:01 PM IST

मुंबई - अनेक मुंबईकरांच्या धकाधकीच्या प्रवासाला विराम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( History of Mumbai CSMT ) येथे लागतो. मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आहे त्यापैकी एक म्हणजे जगविख्यात सीएसएमटी इमारत आहेत. या वास्तूची उभारणी गॉथिक शैलीतील सी अक्षराच्या आकारात तयार केली आहे. या वास्तूला 2004 साली युनेस्कोच्या वतीने जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वास्तुवैभवाला देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनल्यामुळे 2016साली देशातील दहा महत्वाच्या प्रेक्षणीय झाडामध्ये निवडण्यात आले आहेत. या ऐतिहासिक वास्तू विषयी ईटीव्ही भारताचा हा खास रिपोर्ट....

सीएसएमटी
काय आहेत पार्श्वभूमी ?आधुनिक काळातील स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना अशी ओळख असणाऱ्या सीएसएमटी इमारतीला 133 वर्षे दिमाखात उभी आहे. हेरिटेज वास्तूमध्ये या इमारतीचा समावेश केला आहे. आशिया खंडातील पहिली रेल्वे गाडी बोरीबंदर स्थानकातून धावली. ते आताचे सीएसएमटी रेल्वे स्थानक म्हणून नावारुपाला आले असून त्याचा लौकिक जगभरात आहे. ब्रिटिश राजघराण्याच्या वतीने ईस्ट इंडिया कंपनी भारतातला कारभार सांभाळत होती. ब्रिटिश कापड गिरण्यांना लागणारा कापूस हा भारतातून ब्रिटनमध्ये निर्यात होणाऱ्या कच्च्या मालापैकी एक महत्त्वाचा घटक होता. हा कापूस भारतातल्या अंतर्गत भागांमध्ये तयार होत होता. देशाच्या विविध भागांतून कापूस मुंबईतल्या बंदरात आणायचा आणि मुंबईतून जहाजाने तो ब्रिटनला पाठवायचा, या कापसाच्या वाहतुकीसाठी रेल्वे उभारण्याचा निर्णय घेतला.
अठराशे शतकातील स्टेशन
सीएसएमटी स्थानकाचा इतिहास - आज लाखो लोकांच्या गदारोळात हरवून गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे फार प्राचीन काळी काहीसे वेगळेच होते. १८५०मध्ये या परिसरामध्ये १९ एकर जमिनीवर पहिलेवहिले बोरीबंदर स्थानक होते. या स्थानकाचे नावही या परिसरात असलेली बोराची झाडे आणि समुद्र किनाऱ्यावरची बंदरे यावरून बोरीबंदर ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, बोरीबंदर वरून जहाजांमधून मुंबईसाठी सामान आणलं जायचे. या जहाजांमधून प्रवासी वाहतूकही व्हायची. एका बाजूला कठीण कातळ आणि दुसऱ्या बाजूला छोटी टेकडी असलेल्या बोरीबंदर जेट्टीवर उतरण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागायची. प्रवासी आधी जहाजांमधून किंवा लॉन्चमधून छोट्या बोटीमध्ये उतरायचे. मग किनाऱ्याजवळ आल्यावर दगडांवर उड्या टाकायचे. १८५२च्या सुमारास मोठ्या मालवाहू जहाजांच्या सोयीसाठी ही छोटी टेकडी कापून हा प्रदेश सपाट करण्यात आला. येथील दगड बाजूला करून मोठा धक्का बांधण्यात आला.पहिल्यावहिल्या रेल्वे लाइनच्या बांधकामासाठी इंग्लंडहून जहाजातून आलेले सामान उतरवण्याचे बंदर म्हणून बोरीबंदरला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा -Somaiya's New Tweet : सोमय्या म्हणतात तो एफआयआर माझा नाहीच

जुनी मुंबई

स्थानकात झाल्या अनेक सुधारणा
-१८७०च्या दशकापर्यंत बोरीबंदर स्थानकात अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या. हे स्थानक दर काही वर्षांनी अद्ययावत केले जात होते. यामुळे मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहराच बदलून गेला. या बदलाची झळ बोरीबंदर स्थानकापर्यंतही पोहोचली. याच काळात टुमदार अशा बोरीबंदर स्थानकाचे रुप पार बदलून गेले. या जुन्या स्थानकाच्या दक्षिणेकडे व्हिक्टोरिया टर्मिनसची दिमाखदार इमारत उभी राहत होती. जिच्याकडे आज संपूर्ण जगाच्या पाठीवर दुसरे आश्चर्यकारक स्थानक म्हणून त्याकडे पाहिले जाते.मे 1878मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरिक विल्यम्स स्टीव्हन यांनी जीआयपी रेल्वे कंपनीचे इमारत बांधण्यास सुरुवात केली होती. 20 मे 1888मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली होती. त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी 16 लाख 14 हजार रुपयांचा खर्च आला होता.

मुंबई ते ठाणे रेल्वे लाईन
व्हीटीच झालं सीएसएमटी- उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या येथूनच ये-जा करतात. त्यामुळे दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशांची गर्दी असते. या वास्तूला पूर्वी व्हिटोरिया टर्मिनस (व्हीटी) म्हणून संबोधले जात होते. मात्र, त्यात बदल करून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नावाने ओळखले जात आहे. या वास्तूची उभारणी गाॅथिक शैलीतील, सी अक्षराच्या आकारात तयार केली आहे. या वास्तूला २००४ साली युनेस्कोच्यावतीने जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. या वास्तू वैभवाला देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनल्यामुळे, २०१६ साली देशातली १० महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये निवडण्यात आले आहे. सीएसएमटी मुख्यालयातील स्टार चेंबर संपूर्ण वास्तूचा आत्मा आहे. इमारतीच्या मुख्य गाभ्यात छोट्या-छोट्या नक्षीकामाचे सौंदर्य वाढवले आहे. या नक्षीकामात साप, पक्षी, वाघ, सिंह, चिमणी, फुले, वेली यांचा वापर केला आहे. हेही वाचा -Pune Mango Eating Competition : पुण्यात चिमुकल्यांनी मारला हापुस आंब्यांवर ताव, आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा, पाहा Video

ABOUT THE AUTHOR

...view details