महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hindusthani Bhau : हिंदुस्तानी भाऊच्या अडचणी संपेना; आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हिंदुस्तानी भाऊला ( Hindustani Bhau tenders apology ) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. विद्यार्थी आंदोलन प्रकरणी ( Maharashtra student protests ) विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली होती.

By

Published : Feb 5, 2022, 3:44 PM IST

हिंदुस्तानी भाऊ
Hindusthani Bhau

मुंबई -विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊला ( Hindustani Bhau tenders apology ) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. हिंदुस्तानी भाऊची कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आता त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रहावं लागणार आहे. विद्यार्थी आंदोलन प्रकरणी ( Maharashtra student protests ) विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली होती.

बिग बॉसच्या माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला विकास पाठकने ( Vikas Pathak in Students agitation ) सोशल मीडियावर आंदोलनात विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

हुल्लडबाजी सुरू केली आणि दगड, चपला, अंडी फेकली -

विद्यार्थ्यांनी घोषणा फलकांद्वारे सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. काही वेळातच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर हुल्लडबाजी सुरू केली आणि दगड, चपला, अंडी फेकली. त्यात काही पोलीसही जखमी झाले. त्यानंतर विकास पाठक ( हिंदुस्तानी भाऊ ) विद्यार्थ्याच्या आंदोलनात सहभागी ( Hindusthani Bhau in Students Agitation ) झाला होता. दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांविरोधात करण्यासाठी विद्यार्थ्याकडून राज्यभरात मोठ्या प्रमाणात ( Students Agitation for online exam ) आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाला यशस्वी करण्याचे काम हिंदुस्तानी भाऊने ( Hindusthani Bhau viral video ) केले.

गुन्हा दाखल -

मात्र, या आंदोलनानंतर हिंदुस्तानी भाऊने बिनशर्त माफी मागितली. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हा आंदोलनामागचा हेतू होता, असं त्याने स्पष्ट केले. मुंबईतील धारावी परिसरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी हिंदुस्तानी भाऊला जबाबदार धरण्यात आले आहे. दंगल, महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अक्ट या अंतर्गत हिंदुस्तानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -Lata Mangeshkar health : लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, पुन्हा व्हेंटिलेटरवर

ABOUT THE AUTHOR

...view details