मुंबई -जम्मूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत सहसेवक प्रमुख चंद्रकांत शर्मा यांची त्याच्या सुरक्षा रक्षकासह तर, छत्तीसगड राज्यात भाजपचे आमदार भीमा मंडवी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंदू सेवकांच्या हत्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी हिंदू जनजागरण समितीने केली आहे.
हिंदूंच्या हत्यांची सीबीआय चौकशी करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी
काँग्रेस आणि डावे शासन असलेल्या राज्यात या प्रकरणांची निःपक्षपाती पणाने सखोल चौकशी होत नाही, असाही आरोप समितीचे संघटक सुनिल घनवट यांनी पत्रकाद्वारे केला आहे .
यापूर्वीही केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, बंगाल, पंजाब आणि मध्य प्रदेश या काँग्रेस, साम्यवादी आणि तृणमूल शासित राज्यांत हिंदूंना मारले जात आहे. काँग्रेस आणि डावे शासन असलेल्या राज्यात या प्रकरणांची निःपक्षपाती पणाने सखोल चौकशी होत नाही, असाही आरोप समितीचे संघटक सुनिल घनवट यांनी पत्रकाद्वारे केला आहे .
काँग्रेसी डाव्या विचारसरणीच्या या राज्यात हिंदूंना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. देशभरातील हिंदू नेत्यांच्या हत्या या एका व्यापक सुनियोजित कटाचा भाग असल्याचे या समितीने म्हटले आहे. त्यामुळे केंद्रशासनाने यात हस्तक्षेप करून देशभरात होणार्या हिंदूच्या हत्येमागे कोण आहे. तसेच, त्यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सीबीआयचे 'विशेष तपास पथक' नेमावे, अशी मागणी घनवट यांनी केली आहे.