मुंबई गणेशोत्सव सुरू झालेला आहे. मुंबईतील शेकडो गणेशोत्सव मंडळ आहेत. मात्र या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचे वेगळेपण पाहायला मिळते. "अंधेरीचा राजा" king of Andheri म्हणून प्रसिद्ध असलेला 'आझाद नगर सार्वजनिक उत्सव' समितीच्या बाप्पाची 21 दिवसापर्यंत पूजा-अर्चा ganesh puja केल्यानंतर त्यात विसर्जन करण्यात येते. त्यामुळे अंधेरीचा राजा या बाप्पाची एक वेगळी ओळख मुंबईमध्ये आहे. मात्र अंधेरीचा राजा या बाप्पाचे दर्शन घेताना 'रीतीरिवाजाप्रमाणे' पोशाख धारण करणे गरजेचे असल्याचं मंडळाने ठरवले Hindu customs dresssing necessary आहे. Ganeshotav 2022
कोणत्याही भक्ताने दर्शन घेण्याआधी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे Hindu customs dresssing पूर्ण अंगभर असे कपडे घातलेले असावेत, असा नियम अंधेरीचा राजा या मंडळाने केलेले आहे. मात्र आम्ही कोणताही ड्रेस कोड ठेवलेला नाही, असे स्पष्टीकरण या मंडळाचे सल्लागार यशोधर फणसे यांच्याकडून देण्यात आले आहे. तसेच हा नियम आताचा नसून गेल्या दहा वर्षापासून मंडळाकडून हा नियम भक्तांसाठी लागू आहे. देशांमध्ये आजही अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये जाताना हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे पोशाख परिधान केलेला असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अंधेरीच्या राजाचे दर्शन घ्यायला आलेल्या भक्ताने शॉर्ट पॅन्ट किंवा स्लीव्हलेस कपडे घालू नये, अशा प्रकारचा आग्रह केला जातो. मात्र त्यानंतरही अवधाने कोणी महिला किंवा पुरुष भक्ताने पूर्ण अंगभर कपडे घातले नसतील, तर त्या भक्ताला बाप्पाच्या दर्शनाला जाऊ दिले जात नाही. मंडळाकडून त्या भक्तांना कपडे उपलब्ध करून दिले जातात. भक्ताला बाप्पाचे चरण स्पर्श करून दिले जातात. त्यामुळे अंधेरीचा राजा दर्शन घेण्यासाठी काही विशिष्ट ड्रेसकोड आहे, असा कोणताही नियम नाही असं म्हणणं मंडळाचे सल्लागार यशोधर फणसे यांचा आहे.