मुंबई -दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ( Sahyadri channel ) हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित ( Program in Hindi language ) न करता महाराष्ट्राची राजभाषा ( official language ) - मराठीतील ( Marathi ) कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी पत्राद्वारे केली आहे.
भोंगा आंदोलनाने रान पेटले - महाराष्ट्रात मराठी माणसाला न्यायासाठी आणि हक्कासाठी, मराठी तरुणाई व मराठी कलाकारांसाठी नेहमी आग्रही भूमिका घेणाऱ्या मनसेने आता परत एकदा मराठी बाणा दाखवला आहे. 2 महिन्यांअगोदर आपल्या भोंगा आंदोलनाने रान पेटवणाऱ्या मनसेने आता दूरदर्शनच्या सह्याद्री मराठी वाहिनीकडे आपला मोर्चा वळविला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दूरदर्शन पश्चिमचे अप्पर महासंचालक नितीन अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, मराठी भाषेत कार्यक्रमाविषयी मागणी करण्यात आली आहे.
राज ठाकरेचीं पत्राद्वारे मागणी - दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेत कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीत कार्यक्रम प्रसारित करण्यात यावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची 'प्रसारण भवन' या ठिकाणी भेट घेऊन दिले आहे, आणि यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.