मुंबई -टाळेबंदीमुळे कंपनीतील नोकरी गेली. त्यामुळे बेरोजगार झालेल्या तरुणाना दूध वितरण करण्याच्या नोकरीसाठी दुचाकीची गरज होती. मात्र, टाळेबंदीत नोकरी गेल्याने दुचाकी घेण्याइतपत पैसे नसल्याने त्याने दुचाकी चोरली व पोलिसांच्या तावडीत सापडला. सुर्यकांत वडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकी चोर सुरज गोरुले (वय 28 वर्षे ), यास पोलिसांनी अटक केली ( Youth Arrested for Theft Bike ) आहे. न्यायालयाने 2 मार्चपर्यंत सुरज पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी घेतला आरोपीचा शोध- याबाबत आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे ( Mumbai Police ) यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुर्यकांत वडे यांनी त्यांचे भाऊ मारुती वडे याला कामाला येण्या-जाण्यासाठी आपली दुचाकी दिली होती. मारुती हा कामाच्या ठिकाणी रात्री ती दुचाकी लावली. सकाळी काम संपल्यानंतर दुचाकी न दिल्याने त्यांनी शोधाशोध केली. मात्र, त्यांना दुचाकी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने दुचाकीचा शोध घेतल्यास ती दुचाकी सुरज गोरुले हा नंबर प्लेट काढून वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शास आले. त्यानंतर पोलिसांनी सुरज यास ताब्यात घेतले.