महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत गणेशोत्सवानिमित्त पोलीस दलाचा ४० हजाराचा फौजफाटा तैनात

मुंबईतील गणोशत्सवादरम्यान अनुचीत प्रकारावर आळा घालण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच लालबागच्या राजाला देखील मोठा बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.

मुंबई पोलीस

By

Published : Aug 31, 2019, 8:31 PM IST

मुंबई - यावर्षी शहरात गणपती उत्सवाच्या काळामध्ये 40 हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त रस्त्यावर असणार आहे. यासोबतच तटरक्षक दल, नौदल आणि महानगरपालिकेचा समन्वय साधून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच गणपती विसर्जनाच्या वेळी आयसीसी स्वयंसेवी संस्थेसह मुंबई शहरात पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घडामोडीवर लक्ष ठेवले जाणार आहे.


लालबागचा राजाच्या सुरक्षेसाठी 10 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलिस उपायुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 59 सहाय्यक पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 500 पोलीस अंमलदार व राज्य राखीव पोलिस दलाची 1 कंपनी, बरोबरच दंगल नियंत्रण पथक व सीसीटीव्ही व्हॅन पथक तैनात करण्यात आली आहे. यंदा मुंबईत 7703 सार्वजनिक गणपती, तर 1 लाख 32 हजारहून अधिक घरगुती गणपती असणार आहेत. तर तब्बल 11 हजार 667 गौरी स्थापना होणार आहेत. मुंबई शहरात 129 ठिकाणी यंदा गणपती विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details