मुंबई : मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे कोणतेही धार्मिक सण, उत्सव, सांस्कृतिक कार्य जनतेला करता आले नाही. त्यामुळे यंदा गणपती उत्सवामध्ये जोरदार जल्लोष ( Great jubilation in Ganapati festival ) पाहायला मिळाला. गणपतीच्या आधी दहीहंडी देखील अत्यंत जल्लोषात साजरी झाली. मात्र यामध्ये काही वाद्य वाजवणारे किंवा लाऊड स्पीकर लावणारे गणेश मंडळ यांच्याकडून आवाजाची पातळी कमालीची गाठली ( noise level reached the maximum ) गेली.
दोन वर्षानंतर आवाजाची पातळी पुन्हा वाढली :कोरोना महामारीमुळे देश आणि दुनिया अवघे घरात कोंडली गेली होती. त्यामुळे दोन वर्षाची कसर काढावी अशा रीतीने अनेक मंडळांनी मोठ्या आवाजामध्ये लाऊड स्पीकर आणि बँड बाजा लावल्याचे पाहायला मिळाले. त्याचा जनतेला त्रास देखील झाला अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या. मुंबईतील ऑपेरा हाऊस या दक्षिण मुंबईतील भागामध्ये सर्वात जास्त 120 डेसीबल ध्वनी पातळी गाठली गेली. याबाबत मुंबई पोलिसांनी ट्विटरवर त्याची माहिती देखील दिली आहे. तर त्यानंतर शास्त्रीनगर या भागात 118 डेसिबल एवढा आवाजाची पातळी नोंदवली गेली. तसेच गिरगाव चौपाटी ज्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन होते त्या ठिकाणी देखील 106 (db ) डेसिबल इतका आवाज वाढला होता. तर वायू प्रदूषण देखील 9 सप्टेंबर 2022 रोजी फारसे समाधानकारक नव्हते. त्यावेळी शासनाच्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार 71 (pm) इतकी वायू प्रदूषणाची पातळी नोंदवली गेली. खरे तर वायू प्रदूषणाबाबत 40 (pm) पेक्षा खाली पातळी असेल तर अत्यंत चांगले हवामान असल्याचे दर्शविते. तर ध्वनी बाबत मानवाची सामान्य क्षमता 40 डेसीबल तर अधिकतम 70 डेसिबल असते.