महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज कुंद्रा प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज कुंद्राच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपल्यानंतर यासंदर्भातील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

High Court upheld the decision in the Raj Kundra case
राज कुंद्रा प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून

By

Published : Aug 2, 2021, 4:55 PM IST

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत राज कुंद्राने यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज कुंद्राच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपल्यानंतर यासंदर्भातील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

राज्य सरकारचा जोरदार विरोध -

पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत राज कुंद्राने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याला राज्य सरकारने जोरदार विरोध केला आहे.

काय आहे प्रकरण -

अश्लील चित्रफीत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी 19 जुलै रोजी रात्री उशिरा चौकशीनंतर शिल्पा शेट्टी यांचे पती उद्योगपती राज कुंद्राला अटक केली होती. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून आणखी एकाला अटक केली होती. रेयान थारप, असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. दरम्यान, राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2019 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा -मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट' नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड

ABOUT THE AUTHOR

...view details