मुंबई -राज्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदार खासदारांविरोधात प्रलंबित ( Cases Against Former MLA MPs In Maharashtra ) फौजदारी खटल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत सुओ मोटो याचिका दाखल ( Highcourt Suo Moto Petition ) करून घेतलेली होती. या याचिकेवर यापूर्वी मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर ( Hearing On Highcourt Suo Moto Petition On MLA MPs Cases ) सुनावणी करण्यात आली. या सुनावणीदरम्यान आज मुख्य न्यायमूर्ती यांनी स्पेशल बेंचची ( Special Bench For MP MLA Cases ) नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर आता या याचिकेवर सुनावणी होणार असून 25 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात यापूर्वीच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी माजी आमदार-खासदार यांच्या फौजदारी खटल्यांची माहिती मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे. मीडियात बातमी आल्यानंतर, काही माजी आमदारांनी सांगितले की, त्यांच्यावरील खटले मागे घेण्यासाठी एक जीआर पारित करण्यात आला आहे. ती प्रकरणे धरणे, चक्का जामशी निगडित आहेत. मात्र, विशेष खंडपीठाने तसे निर्देश दिले तरच ते खटले मागे घेता येतील, असे मॅजिस्ट्रेटने सांगितल्याची माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली आहे.
या नेत्यांवर आहे केसेस -