महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

समजणाऱ्या भाषेत कागदपत्रे न दिल्याने अ‍ॅगिसिलाओस डेमेट्रिएड्सला उच्च न्यायालयाचा अटकेपासून दिलासा - not providing documents in understandable language

अ‍ॅजिसिलॉस डेमेट्रिएड्सला काही कागदपत्रे हिंदीत पुरविल्याचा दावा केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांची अवैध वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटकेचा आदेश रद्द केला (High Court relieves Agisilaos Demetriades). भाषा त्याला समजत नाही असे कारण देण्यात आले (not providing documents in understandable language). न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने याबाबतचा आदेश दिला.

उच्च न्यायालयाचा अटकेपासून दिलासा
उच्च न्यायालयाचा अटकेपासून दिलासा

By

Published : Sep 16, 2022, 8:28 PM IST

मुंबई -अभिनेता अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ अ‍ॅजिसिलॉस डेमेट्रिएड्सला काही कागदपत्रे हिंदीत पुरविल्याचा दावा केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांची अवैध वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटकेचा आदेश रद्द केला. भाषा त्याला समजत नाही असे कारण देण्यात आले. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने याबाबतचा आदेश दिला.

डेमेट्रिएड्सच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर हा आदेश पारित केला की त्याला स्वतःचा बचाव करण्याची योग्य संधी देण्यासाठी अनुवादित प्रत देणे अत्यावश्यक आहे. ते न झाल्याने अटकेचे कारण याचिकाकर्त्याला कळवले गेले नाही आणि त्यामुळे याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते.

सुमारे एक वर्षापूर्वी, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाचे सहसचिव, रवी प्रताप यांनी बेकायदेशीर तस्करीमध्ये सहभागी होण्यापासून डेमेट्रिएड्सना रोखण्यासाठी PIT-NDPS कायद्याच्या कलम 3(1) अंतर्गत अटकेचा आदेश जारी केला. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थाच्या संदर्भात त्याच्यावर आरोप होते. डेले रिसॉर्ट्स, लोणावळा येथील डेमेट्रिएड्सच्या खोलीवर प्रथमच छापा टाकला असता 0.8 ग्रॅम चरस सापडले. त्यानंतर त्याच्या खारच्या घरातून अल्प्राझोलमची एक पट्टीही सापडली होती. 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती. ज्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आरोपी होती.

दोन्ही प्रकरणांमध्ये त्याला जामीन मिळाल्यानंतर डेमेट्रिएड्सच्या विरोधात अटकेचा आदेश जारी करण्यात आला, असा त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असलेल्या अ‍ॅजिसिलॉसने अटकेच्या आदेशाविरुद्ध गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यांनी दिलासा नाकारला गेला. 20 एप्रिल 2022 रोजी गोव्यातून डेमेट्रिएड्सला ताब्यात घेण्यात आले आणि आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details