मुंबई :पुण्यातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मुनिब मेमनचा जामीन अर्ज ( Bail application of accused Munib Memon ) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पुण्यात 2012 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी निर्दोष नाही. सध्या स्थितीत असलेल्या पुराव्यावरून असे दिसून येते की आरोपी विरोधातील आरोप सत्यप्रतीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने केले आहे. यापूर्वी देखील सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला होता. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. आरोपीला अटक केल्यापासून सुमारे दहा वर्ष च्या जवळपास आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. 1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यातील जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाला होता. स्फोट न झालेला बॉम्बही निकामी करण्यात आले होते.
बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक केली होती. यापैकी मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि बंटी जहागीरदार या प्रकरणात त्यांच्या कथित सहभागाबद्दल त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा MCOCA, स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने सविस्तर निकाल शनिवारी जाहीर केला आहे. खंडपीठाने म्हटले की ते मेमनला समानतेवर दिलासा देऊ शकत नाही कारण त्याच्या सहआरोपींना जामिनावर वाढवलेले कारण याचिकाकर्त्यापेक्षा पूर्णपणे भिन्न होते.